
0
5
6
8
0
0
निवांत क्षण
आयुष्याच्या धावपळीत
निवांत क्षण दुर्मिळ फार
संपता संपेना डोईवरचा
कर्तव्याचा अवजड भार…!!
दिवस आठवडा महिना
वर्षेसुद्धा कित्येक संपले
कामातून मान वर होईना
संसाराने कसे हे व्यापले..!!
हरवल्या बालमैत्रीणी नि
आप्तस्वकीयातही अंतर
वर्षानुवर्षाचा पडला विसर
ठरवले फक्त भेटूया नंतर…!!
पाखरांची किलबिल गाणी
अन वाऱ्याची शीळ कानी
उन्हाळ्यातील रानमेवाही
झालाय दुर्मिळ रानोरानी..!!
रोज नवी समस्या ठरलेली
हेच जीवनाचे शाश्वत सत्य
तन मनाची कसरत कायम
शोधती निवांत क्षण नित्य…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
5
6
8
0
0



