
0
4
0
9
0
3
नाते मैत्रीचे
मैत्रीचे नाते अनमोल रत्न
कडक उन्हातील दाट छाया
थंडगार झुळूक देऊन
सोडवते आयुष्याची काया !!
नाती अनेक भेटतात जगण्यात
काहीच अपलसे वाटते,
रमायला होत छान त्यांच्यात
दुःख चेहऱ्या माहगे लपवून
हसवण्याचा प्रयत्न , करून
क्षणात दुःख विसरायला लावते !!
काळ बदलो, दिवस सरो
तरी जपत राहावी मैत्री
नात न हरपाव जीवनभर
मैत्री चमकत राहावी निरंतर!!
विश्वासाच्या पुलाखालून वाहात
राहावे निस्वार्थी, निखळ, झरे
आपल्या गैरहजरीत आपली
ठामपणे बाजू मांडते
तेच नाते मैत्रीचे खरे..!!
कल्पना सुरवसे
जिल्हा धाराशिव
0
4
0
9
0
3





