Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

कर्मचा-यांना ‘या दिवशी’ दुपारीच भेटणार निवडणूक भत्ता ऑनलाईन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कर्मचा-यांकडून स्वागत

0 1 8 3 0 9

कर्मचा-यांना ‘या दिवशी’ दुपारीच भेटणार निवडणूक भत्ता ऑनलाईन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कर्मचा-यांकडून स्वागत

जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज

नागपूर: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता अदा करण्यात येतो. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी याना निवडणूक भत्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याच्या अनुषंगाने मागदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेतः- (१) निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी इ. पदासाठी नेमण्यात आलेले

अधिकारी/कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती NIC ने विकसित केलेल्या Polling Personnel Management System (PPMS) या Software मध्ये भरण्यात आलेली आहे. उपरोक्त अधिकारी / कर्मचारी यांचे Second Randomization झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करावी.

उपरोक्त अधिकारी/कर्मचारी यांची पहिले व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी NIC च्या Software मध्ये नोंदविण्यात यावी. तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करते वेळी, मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे, याची नोंद सॉफ्टवेअर मध्ये करावी.

Third Randomization झाल्यानंतर उपरोक्त नमूद अधिकारी/कर्मचारी यांना अदा करावयाच्या रक्कमेची परिगणना ही NIC च्या Software मधून करण्यात येईल व संपूर्ण मतदार संघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार होईल. सदर नमुना Download करुन निवडणूक निर्णय अधिकारी / आहरण व संवितरण अधिकारी यांचे ज्या बँकत खाते आहे, त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठविण्यात यावी.

NIC च्या Software मध्ये नोंदवलेले बँक खाते हे योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरीता दिनांक १८/११/२०२४ रोजी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यावर १ रुपया निवडणूक निर्णय अधिकारी / आहरण व संवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करुन, संबंधितांची बँक खाते योग्य असल्याबाबत खात्री करण्यात यावी. बँक खाते चुकीचे आढळून आल्यास सॉफ्टवेअर मध्ये योग्य बँक खात्याची नोंद करण्यात यावी. तसेच मतदान पथकांना रवाना करतांना ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना Trial Payment मिळालेले नाही, त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती NIC च्या Software मध्ये अद्ययावत करावी.

अशाप्रकारे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत खात्री करुन घेतल्यानंतर, दिनांक १९.११.२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत NIC Software मधून Automatic Generated Scroll (“Same Bank Scroll” व “NEFT Scroll”) Download करुन सदर Scroll ची प्रिन्ट संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी/आहरण व संवितरण अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना रक्कम अदा करण्याबाबत पत्राद्वारे बँकेस कळवावे. सदर पत्रामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदरची रक्कम दुपारी ०१.०० वाजता अदा होईल, अशी कार्यवाही करण्याबाबत बँकेस सूचना देण्यात याव्यात.

उपरोक्त सूचनांचे पालन करुन त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी आपणांस विनंती आहे. मात्र ज्या जिल्ह्यांना सदर सूचनेनुसार NIC च्या Software मार्फत निवडणूक भत्ता अदा करणे शक्य होणार नाही असे वाटत असेल, त्या जिल्ह्यांनी याबाबत सबळ कारणमिमांसा देऊन, उपरोक्त प्रक्रियेचे पालन न करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर घ्यावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 0 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे