“मतदार राजा जागा हो” पथनाट्याचे सादरीकरण
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
“मतदार राजा जागा हो” पथनाट्याचे सादरीकरण
कुही पंचायत समितीतर्फे मतदार जनजागृती
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर/ कुही: मतदारांना जागृत करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार पंचायत समिती कुहीच्या वतीने मतदान जनजागृती बाईक रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
पंचायत समिती कुही कार्यालय येथून तहसीलदार अरविंद हिंगे,गटविकास अधिकारी डाॅ.स्वप्निल मेश्राम व गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली.त्याचवेळी चौकाचौकात पोवाडे ,गीते सादर करण्यात आली.
तसेच माधुरी वसंतशोभा लिखीत पथनाट्यः “मतदार राजा जागा हो” सादर करण्यात आले.या पथनाट्यात माधूरी सेलोकर,उज्वला उके,अर्चना खैरे,प्रकाश दुलेवाले,सुनिल ठाकरे,संजय मानकर,धर्मरक्षित कावळे,विष्णू भलावी यांनी भूमिका वठवली.तसेच या रॅलीत शिक्षणविस्तार अधिकारी गणेश लुटे,अशोक बांते केंद्रप्रमुख मनोज बोरकर,प्रचिती कातकडे,महेंद्र पारसे,महेंद्र धारगावे,राजाराम रत्नाम,उषा चव्हाण,सुनिल चावके,अभिमन्यू वंजारी सहभागी झाले होते.





