Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपुणेमहाराष्ट्रमुंबईसंपादकीय

“चला करू मतदान” पथ-नाट्याद्वारे लक्षवेधक मतदानजागृती

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

“चला करू मतदान” पथ-नाट्याद्वारे लक्षवेधक मतदानजागृती

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे-दि.18 (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची मतदानात मोठी उदासिनता व निरूत्साह दिसून आला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी खूपच कमी झाली. ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यावेळी विधान सभेच्या २० नोव्हेंबरला होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा; आणि जनतेने मोठ्या प्रमाणात उत्साहाने मतदान करावे यासाठी सरकारी व खाजगी पातळीवर बरेच प्रयत्न सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर केशव माधव न्यास आयोजित ‘चला करू मतदान’ या पथ-नाट्याद्वारे पुणे शहरात मतदान जागृती करण्यात येत आहे. पुणे शहरात शंभर टक्के मतदान व्हावे, “नोटा” हा पर्याय निवडू नये, योग्य उमेदवारालाच मतदान करावे, आपण “मतदार राजा” असल्याने सजग राहून विचारपूर्वक, कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे व स्वयंस्फूर्तीने मतदानाला बाहेर पडावे. लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याने अशा मतदान जागृती अभियानाची गरज असून प्रत्येकाने वैयक्तीक व सामुहिक पातळीवर लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन या पथनाट्य चमूने केले आहे.

श्रीराम चौक,कमिन्स महाविद्यालय चौक, गुळवणी महाराज रोड,सहवास चौक, कुलश्री कॉलनी, मधुसंचय गणपती मंदिर,ताथवडे उद्यान, शामाप्रसाद मुखर्जी उद्यान,अलंकार दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर तसेच विविध महाविद्यालयाची प्रवेशद्वारे, माॅल व सिनेमागृहांची प्रवेशद्वारे अशा जवळजवळ 100 ठिकाणी गर्दीच्या वेळी हे पथनाट्य सादर करण्यात आले.

सुप्रसिद्ध नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे यांनी या पथनाट्याचे संहिता लेखन व दिग्दर्शन केले असून डॉ.सतीश जोशी,सुभाष फडके,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त), विंग कमांडर अविनाश मुथाळ, (निवृत्त) एअर कमांडर, अरुण इनामदार,श्रीकांत पुराणिक,मोहन मोने,अरविंद देशपांडे, प्रशांत कुलकर्णी,रमेश खेडकर इत्यादी 15 कलाकारांनी या नथनाट्यात भूमिका रंगवल्या आहेत.

नवमतदार तरुणाई,मतदानाचा हक्क बजावणात उदासिन असणारे नागरिक यांना या पथनाट्याने प्रेरीत करण्याचे काम केले असून पथनाट्यास उपस्थित असलेल्या लोकांना मतदान करण्याची शपथ देखील देण्यात आली, अशी माहिती “केशव माधव न्यासा”चे विश्वस्त, श्री. प्रकाश देशपांडे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे