गणेशोत्सवात पुण्याचा झेंडा परदेशात
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
गणेशोत्सवात पुण्याचा झेंडा परदेशात
टोरोंटो,कॕनडाला कल्पना देशपांडे यांचे एकपात्री
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे, दि. 18 सप्टें.(प्रतिनिधी) गणेशोत्सव म्हणजे कलाकरांना आपली कला सादर करण्याची महापर्वणी. भारतभर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असतानाच परदेशात स्थायिक झालेले भारतीय देखिल आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात सादर करताना माध्यमातून पहायला मिळतात. असाच हर्षोल्हासात टोरोंटो, कॕनडा येथे साज-या झालेल्या गणेशोत्सवात पुण्याच्या गुणी कलाकार कल्पना देशपांडे यांचा एकपात्री प्रयोग सादर झाला.
बालगंधर्व पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या कल्पना देशपांडे यांचे एकपात्रीचे प्रयोग भारतभर सुरू असतात. परदेशात सुध्दा यापूर्वीही त्यांनी आपले एकपात्रीचे कार्यक्रम गाजवले आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा त्यांना टोरोंटो, कॕनडा येथेआमंत्रित करण्यात आले होते. हिंदू सभा ब्राम्पटन येथे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा एकपात्रीचा प्रयोग रंगला.
सकाळपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रथम.श्रध्दापूर्वक गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. सामुहिक अथर्वशीर्ष पठण, गणेश मूर्ती घडवण्याचे वर्कशाॕप, ढोल ताशा वादन असे कार्यक्रमाचे विविधरंगी स्वरूप होते. अशा उत्सवी वातावरणात कल्पनाताईंच्या एकपात्रीने विनोदाचे रंग भरले आणि रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली. यानिमित्त पुण्याच्या कलेचा झेंडा परदेशीही फडकला. परदेशात राहून भारतीय लोक आपली संस्कृती जपतात आणि आवर्जुन भारतीय कलाकारांना, तेही पुणातून निमंत्रित करतात, याबद्दल कल्पनाताईंनी समाधान व्यक्त केले.





