नागपूरच्या गडकरींनी घेतली चौथ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ; ‘रोड’करींची पुन्हा वर्णी
नागपूरच्या गडकरींनी घेतली चौथ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ; ‘रोड’करींची पुन्हा वर्णी
मोदी सरकारचे टॉप २० मंत्री
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी जमला होती. विशेष म्हणजे देशात एनडीएचं सरकार आल्यापासून विविध देशातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटरवरुन अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, आजच्या शपथविधी सोहळ्यासही अनेक परदेशी पाहुणे हजर होते. मै नरेंद्र दामोदारदास मोदी… ईश्वर साक्ष शपथ लेता हूँ की, विधिद्वारे स्थापित सच्ची श्रद्धा और निष्ठा से काम करुंगा, असे म्हणत मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रीक केली.
पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्य क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर,नागपूरचे रोडकरी म्हणून ख्यातीप्राप्त खासदार नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते, तर राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते. नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. त्यामुळे, मोदी 3.0 सराकरमध्ये गृह आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर, रजीनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गज दिसून आले. दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी 3.0 मध्ये एकूण 20 नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये हे नेते सहभागी झाले नव्हते. यावरून त्यांचा यावेळी मोदी मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सर्वप्रथम शपथ घेणारे पहिले 20 मंत्री
1.नरेंद्र दामोदरदास मोदी
2.राजनाथ सिंह
3.अमित शाह
4. नितीन गडकरी
5. जगतप्रकाश नड्डा
6.शिवराजसिंह चौहान
7.निर्मला सितारमण
8.जयशंकर
9.मनोहरलाल खट्टर
10.कुमार स्वामी
11. पियुष गोयल
12.धमेंद्र प्रधान
13.जितनराम मांझी
14. ललनसिंग – जनता दल (नितीश कुमार)
15. सर्वानंद सोनोवाल – आसाम (भाजप)
16.डॉ. विरेंद्र कुमार – मध्य प्रदेश (भाजप)
17.किंजरापूरा नायडू
18.प्रल्हाद जोशी – मध्य प्रदेश (भाजप)
19.जुएल ओराम
20.गिरीराज सिंह