
0
4
8
2
5
1
चिऊलं – काऊलं
चिऊ म्हणाली काऊला
जग लागलं बदलायला
चिंगीची तर बदलली Style
सदानकदा हातात Mobile
आपलं मेलं शेणामेणाचं House
आपणही हातात घेऊ Mouse
मिठूनं आणला Computer
मैनेनं दिलं Software
माझं चिऊलं खेळते Game
छोट्याला म्हणते What’s your name?
माझंही काऊलं Very good
पण खायला मागते Fast food
चल बाई चिऊ झालो Late
चिऊलं – काऊलं करत असतील Wait
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि नागपूर
0
4
8
2
5
1



