Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील कविता

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : पाठांतर📘*
*🔸मंगळवार : २५/ मार्च /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पाठांतर*

गुरुजी आले वर्गात
धाक पडला आम्हा
विचारणा करतील
झाले पाठांतर तुम्हा

हळूहळू पाटोपाट
गण्या तिथे आला
गुरुजी मी नव्हतो
सांगून खाली बसला

सोनी खूप हुशार
सुरु पाढे म्हणायला
शाब्बास म्हणे गुरुजी
तिच्या पाठांतराला

हृदयाचे ठोके होते
हळूहळू तेव्हा वाढत
घंटी वाजावी पटकन
होतो न हात जोडत

एक दोन तीन चार
सारेच पटापट सांगे
नव्हता केला अभ्यास
डोक्यात नुसते वांगे

घंटी काही वाजे नाही
पण गुरुजी आले जवळ
बे चा पाढा सांग नाही तर
हातावर छडी ने देईल फळ

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

आई म्हणे बाळाला
शाळेत का जात नाही ?
काय करू गं आई…..
सांगितलेले पाठांतरचं होत नाही…! ।।

शाळेत जाता गुरूजी
करतील…बाकावर उभे
दोन्ही हात पुढे करून
देतील छडीचे फटके….।।

आज एक उद्या एक
रोजच नवा विषय …
डोक्याचं झालं खोकं तरी
देनं काही सोडत नाही ।।

ठेवतात आम्हाला गुरुजी
चार भिंतीत बंद……..
डोक्यावर सारखं
पाठांतराचं ओझं …।।

आज केलं पाठांतर
उद्या विसरून जातो
विटीदांडूचा खेळ मात्र
मला खुप आवडतो…! ।।

असं वाटतं पाठांतराला
जागा नसावी शाळेत
खेळनं-कुदनं ,मौज-मस्ती
हेच दिसावं चौफेर ।।

आई बोलली बाळाला
अरे असंही होईल….
आधी कर अभ्यास
मग खेळ कुदही घेतील ।।

*सौ.कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

राजू आमचा फार हुशार
खेळतो नेहमीच गेम
कधी कुणाला गंडवेल
याचा मुळीच नसतो नेम ॥

खेळणे , कुदणे , खोडया करणे
जणू त्याच्या कृष्णलीला
अभ्यासात जरी कच्चा लिंबू
धावतो साऱ्यांच्या मदतीला ॥

एकदा शाळेत गुरुजींनी
सांगितले पाढे पाठांतर करायला
बाकावर बसतांना तिसरा नंबर
लढविली शक्कल उत्तर घायला ॥

घोकून घोकून चारचा पाढा
मस्त पाठांतर करून गेला
दुसऱ्या बाकावरचा मित्र मात्र
त्या दिवशी गैरहजर राहिला ॥

तीनचा पाढा म्हणता म्हणता
राजूचा मात्र गेम चुकला
पळवाट काढतांना
बिचाऱ्याचा नेम हुकला ॥

आता मात्र राजूने
कानाला लावला खडा
शॉर्टकट मारणे सोडून दिले
घेतला चांगलाच धडा ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६३ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पाठांतर*

चला गड्यांनो आज
वेळ आहे अवांतर
सारे मिळून आपण
करूया पाठांतर ||

बाईंनी सांगितली
कविता लई छान
तालासुरात नाचत
साऱ्यांनी पकडली तान ||

चिंटू सांगे साऱ्यांना
पाढे पाठ करू
गुणाकार भागाकार
हवेतच मस्त करू ||

आठवड्याचे वार
वर्षाचे महिने बारा
सर्वांनी सांगायचे
नाहीतर चढेल पारा ||

ए फॉर अँप्पल
बी फॉर बॉल
ऑफिसातून आला
सरांना कॉल ||

जाता जाता सर म्हणे
अभ्यास करा निरंतर
वार्षिक परीक्षेची
भीती होईल छुमंतर ||

*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

एक होती मुंगी
बोलावले तिने दोस्त
नेसून आपण लुंगी
जाऊ शाळेत मस्त ॥१॥

शाळा भरवू घरात
चढू सारे पलंगावर
कोणी नाही पहात
करू या पाठांतर ॥२॥

गुळाभोवती फेर धरू
करू कवितेचे पाठांतर
गाण्याचा रियाज करू
गुळ खाऊ मध्यंतर ॥३॥

समोर दिसला रसगुल्ला
मारला त्यांनी डल्ला
पटकन साऱ्यांनी खाल्ला
केला मुंग्यांनी कल्ला ॥४॥

आली मालकीण
राहील पाठांतर
औषधी पेरली झरकन
मार बसला अवांतर ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

करा वाचन समज पूर्वक
करू नका, तुम्ही पोपटपंची,
अभ्यासात मागे,राहून
नका करू फजिती तुमची.

नसता होईल तुमची गळचेपी.
जातील, सारे पुढे पुढे,
ऐकून ऐकून सरावाने होईल
गुणवंत्तेत जाल तुम्ही पुढे.

करा वाचन समजपूर्वक,
पाठांतराची सवय लावा,
पुढंच,पाठ मागचं सपाट
होऊ नये, मनाला शिस्त लावा.

लेखन चिंतन, मनन करून
पाठांतर तुम्ही करावे,
म्हणायचे म्हणून म्हणू नये
स्मरणात कायम ठेवावे.

चढाओढ लावू पाहू, कोणाच्या
कविता पाठ लवकर होतात,
नंबर माझाच, येणार पहिला
सारे माझे कौतुक करतात.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

मित्र मित्र मिळालो दोघे
शर्त लागली अभ्यासाची
स्मरणात तर राहणार नाही
सवय लावू पाठांतराची

मोठे मोठे असतात उत्तर
स्मरणात राहणार नाही
हळूहळू पठण करू
तेवढे भारी जाणार नाही

झोप जरी लागत आली
एक एक चावू कच्चा चना
त्याने झोप येणार नाही
कळणार नाही बाबांना

गद्य प्रश्नांची उत्तर व
कवितेचे करू पाठांतर
गुरूजीने जरी विचारले वर्गात
दोघे सांगू उत्तर भरभर

पाठांतरच सवय लावते अभ्यासाची
दररोज करू दोघे अभ्यास
हा फायदा आहे आपलाच
नाही होणार आपल्याला आभास

पाठांतराने वाढतो बुध्दी
आपल्याच ज्ञानाची होतो वृध्दी
व्यक्तिमत्व विकास येतो घडून
हीच विकासाची घडी येतो चालून

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार. समुह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

प्राथमिक शाळेत
कविता नि धडे
पाठांतर केले
स्मरणात गडे

आताही आठवते
देवाचे घर बाई
कवितेच्या ओळी
पाठांतर घेई ताई

पाठांतराने झाले
शब्दांचे उच्चार
स्पष्ट आणि बिनचूक
उत्तर आले बरोबर

वाचन पाठांतर
नियमीत सराव
आकलनावर भर
उतारा वाचा

दोघा दोघांचे गट
समजावून सांगु
उत्तर सांगा पटपट
लेखन तयारी करू

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

अ,आ,इ पाठांतर
क,का,की पाठांतर
वर्णाक्षरे पाठांतर
बाराखडी पाठांतर

आई म्हणे वाचन कर
मराठीच्या गोष्टी पाठांतर
ताई सांगे बे चे पाढे
कर म्हणे पाठांतर

गुरुजीचा धाक लयी भारी
गायला सांगत कवितेच्या ओळी
हातात त्यांच्या रुळ पाहून
सांगतसे मी कविता गाऊन

शाळेत असे पाठांतरावर जोर
खाता घेता बडबड फार
उतारा आठवण्यावर असे जोर
बडबड गीत आवडत फार

पाठांतर पाठांतर
नुसती घोकंपट्टी कर
थोरांचे चरीत्र पाठांतर
इसवीसन पाठांतर

अभ्यासाची हीच रीत
सारेजण गुरजीले भीत
धाकाने करु पाठांतर
उत्तरे लिहू भराभर

*अनिल मेश्राम*
*सौंदड रेल्वे, जिल्हा गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿
*पाठांतर*

पाठांतर करावे तोंडपाठ
घोकंपट्टीतून सूटावे
अ आ इ चौदाखडी बोलावे
१,२,३,…१००अंक मुखपाठ।।१।।

२ ४ ६ पाढे सगळे पाठ करु
गणितासाठी आता तयार जणू
चौदाखडी वाचन लेखन करू
कवता गाणी तोंडपाठ म्हणू।।२।।

इंग्रजी मराठी बारा महिने तोंडपाठ घेऊ
दाही दिशा दावित करावे मुखपाठ असो
ऋतूंची नावे पाठांतर सातवार नित्यपाठ करू
घोकंपट्टी नको मुळज्ञान पाठांतर असो।।३।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील*
*ता.शहादा जि.नंदुरबार*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍂🔰🍂➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे