ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
आयुष्यावर बोलू काही
मनिषा कडू हडपसर, पुणे

0
5
1
7
9
5
आयुष्यावर बोलू काही
इवल्या इवल्या पावलांनी,
झुळूक आली तान्हूल्याची!
दुडदुडत्या त्या पाहुण्याला,
नजर ना लागो कुणाची!!
सरसरते मग ते बालपण,
झरझरत्या त्या क्षणांनी,
मुठीत घेऊ पाहता क्षणांना,
हळूच गुडूप होऊन जाती!
तारुण्याची हाक हरवते,
कवेत घेऊनी, रंगीबेरंगी स्वप्नांना,
पंखात बळ येऊ लागते,
मग हळूच भरारी घेताना!!
स्वप्नांना त्या देऊनी मुलामा,
महत्वकांक्षा, मेहनत अन सातत्याचा,
उरी बाळगले स्वप्न ते,
आकाशी उंच झेपवण्याचा!!
उडत उडता जाणीव व्हावी,
स्वत्वाची अन अंतरीची,
मग वाटे धावे का मन,
या सगळ्याच्या उगाच पाठी!!
अंतरीचे समाधान, अन माणुसकीची जाण!
ठेवावी जपून, आपुलकीची आण!
माणूस म्हणून जगताना आता,
कर्तव्यबुद्धीची असावी जाण..!!!
मनिषा कडू
हडपसर, पुणे
0
5
1
7
9
5



