स्वरगंगा….. गाणे….. तराने!
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहिल्या नगर
स्वरगंगा….. गाणे….. तराने!
“दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई
काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई.”
विधात्याने निर्माण केलेल्या सर्वांग सुंदर मानवी मनाला पडलेला हा प्रश्न… स्वर्गीय गायक आर्त मधुर अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या आवाजात गाऊन मुकेश यांनी या गाण्यात जो भाव प्रतित केला आहे तो थेट हृदयाला जाऊन भिडतो.या गीतातले हे भावस्पर्शी, वास्तवदर्शी शब्द ज्यांच्या लेखणीतून साकार झाले असे सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले गीतकार हसरत जयपुरी तसेच त्याला ‘भैरवी’ रागातून संगीताचा साज चढवून अलंकृत करणारे *संगीत दिग्दर्शक शंकर-जयकिशन अशा या त्रिमूर्तींच्या संकल्पनेतून साकारलेलं 1966 साली आलेल्या तिसरी कसम या चित्रपटातून राजकपूर वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत.
आपल्या आयुष्यात जेव्हा सुख-दुःखाचे चढ-उतार येतात तेव्हा नक्की या ओळींची आठवण होते…
तू भी तडपा होगा मन को बनाकर
तूफां ये प्यार का मन मे छुपाकर |
आणि
आसू भी छल के होंगे पलकों से तेरी
बोल क्या सुझी तुझको
काहे को प्रीत जगाई ||
या प्रेमामुळेच आपण जीवनात सुख शांती मिळवू शकतो. कारण ते एकमेकांवर प्रेम करण्याचे शिकवताना आनंदी राहता येते हे ही या जग नियंत्यानेचं सांगितले असावे.
प्रीत बना के तूने जीना सिखाया
हसना सिखाया, रोना सिखाया |
आणि त्यातून जीवन सुंदर स्वप्निल होत गेलं. माणूस स्वप्न पाहू लागला. या स्वप्नांच्या दुनियेत रममाण होत जाणं हा मानवी स्वभाव पण अचानक हाच जगाचा निर्माता जेव्हा
मीत मिला के तूने सपने जगाए || असावी योग घडवून आणतो तेव्हा माणूस त्याला प्रश्न विचारत असतो
काहे को दुनिया बनाई तूने
काहे को दुनिया बनाई |
या दुनियेचा तू नियंता…. तुझ्या विश्वासावर आम्ही जीवन जगतो पण तू जी दुनिया बनवली होती तुझ्या मनाप्रमाणे, तुझ्यात सामावलेली आहे. असं असलं तरी आज कालच्या युगातील या मानवाकडे पाहिलं की मला नेहमीच वाटतं की,
काहे बनाये तुने माती के पुतले
धरती ये प्यारी प्यारी मुखडे ये उजले |
जग सुंदर आहे. धरती स्वर्ग आहे. हे तुझं मत. पण इथे राहणारे आम्ही मानव मात्र रंग उडालेल्या निर्विकार उदास चेहऱ्याने जगणारे आणि तू मात्र “गुपचूप तमाशा देखे, वाह रे तेरी खुदाई काहे को दुनिया बनाई |” काश!.. परमेश्वराने जर खरच त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलं तर नक्कीच गीत काराच्या शब्दा मधला सर्वांना अभिप्रेत असणारा जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट होईल आणि हाचं दुनिया बनाने वाला प्रभू परमात्मा आपले जीवन सुखकर करील. तर असं हे प्रत्येकाच्या अंतर्मनात डोकावून वास्तविकतेवर आधारित अकल्पनीय गीत… तुम्ही ऐकलं असेल… कधीतरी तुम्ही आयुष्यातल्या चढ-उताराच्या प्रसंगी त्याला म्हणत असाल, दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई..| असं हे ‘old is gold’ रगीत तुम्ही ऐकलं असेल… मलाही सांगा,’तुम्हाला हे गाणं आवडलं का..!’
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्या नगर



