डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘राजकपूर जन्मशताब्दी’ पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘राजकपूर जन्मशताब्दी’ पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे
पुणे : (दि १९) आंतरराष्ट्रीय कीर्तिचे, कलावंत, शीळवादक, गायक, अभिनेते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच श्रीदा क्रिएशन आणि सॅम फिल्म इंटरनॅशनल या दोन संस्थांनी स्वतंत्ररित्या राजकपूर जन्मशताब्दी पुरस्काराने जाहिररित्या सन्मानित केले.”
1963 पासून शीळवादन, 1965 पासून चित्रपट गीतांचे सादरीकरण, लघुपट, अनुबोधपट, देशविदेशातील गेली 6 दशके एकपात्री कार्यक्रम आदि विविथ पातळीवर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केलेले विश्वविक्रमांनी डाॅ.घाणेकर यांचा सुवर्णयुगाचाच काळ घडत आहे.त्यांचे हे योगदान रसिकांना नक्कीच प्रेरणादायी आहे ” असे गौरवोद्गार श्रीदा क्रिएशन संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष आणि अभिनेत्री प्रिया दामले यांनी डाॅ.घाणेकर यांना पुरस्कार प्रदान करताना काढले.
” डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आत्तापर्यंत निर्मिती केलेल्या लघुपटांसाठी संकल्पना, कथा, पटकथा, संवाद,दिग्दर्शन, प्रमुख भूमिका , गीत, संगीत, गायन, नेपथ्य ,कला दिग्दर्शन आदि अनेक जबाबदा-या स्वतः यशस्वीरित्या पार पाडतात. शीळवादन तर त्यांची खासीयतच असते. असे बहुआयामी,निगर्वी आणि स्वतःबरोबर दुस-यांना बरोबर घेऊन जाणारे हरहुनूनरी , आनंदी व्यक्तिमत्व दुर्मिळच ” असे प्रतिपादन सॅम फिल्म इंटरनॅशनलच्या अध्यक्ष आणि अभिनेत्री डाॅ.समता कुलकर्णी यांनी डाॅ.घाणेकर यांना पुरस्कार प्रदान करताना केले.
महिला सन्मान.च्या उपाध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे
यांनी प्रास्ताविक केले. याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर लिखित ‘ दिवाना मुझको लोग कहे ‘ हे राजकपूर यांच्या चित्रपट कारकिर्दी विषयक पुस्तक तसेच डाॅ.घाणेकर संपादित 646 व्या विश्वविक्रमी डहाळी.अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी राजकपूर यांच्या
चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकत राजकपूर यांची काही गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. भेटेल त्या व्यक्तीला आनंद द्या हे राजकपूर यांच्या भूमिकांवरुन निश्चित बोध होतो असे डाॅ.घाणेकर यांनी सांगितले.उर्मिला आपटे, अनुपमा लिमये , श्रीनिवास तेलंग , शैलजा सोमण, आदि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, वसुधा इंटरनॅशनल.च्या अध्यक्ष वसुधा नाईक, कवी बाबा ठाकूर तसेच गायक गोरख भोयर, डाॅ.विनोद कांबळे, दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्ष सोनिया गोळे, आणि नीला विद्वांस, माया फडके, दत्तात्रय पाटे, चंद्रकांत अवरंगे , मनोज देशपांडे, अशोक चव्हाण आदि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती. सांजभेट संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप शुक्ल तसेच मधुरा भागवत, अंकुश शिर्के यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रिया दामले यांनी
आभार मानले.
कृपया प्रसिध्दीसाठी
प्रिया दामले
संस्थापक आणि अध्यक्ष
श्रीदा क्रिएशन.
वसुधा नाईक.. अध्यक्ष – वसुधा इंटरनॅशनल





