जि.प. उच्च के. प्रा शा “रामा’ तर्फे क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन
सहशालेय उपक्रमातून 'आठवणीची शिदोरी'

जि.प. उच्च के. प्रा शा “रामा’ तर्फे क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन
मुलांनी लुटला क्षेत्रीभेटीतून वनभोजनाचा आनंद
सहशालेय उपक्रमातून ‘आठवणीची शिदोरी’
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि २६) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, रामाच्या वतीने क्षेत्रभेट व वनभोजन कार्यक्रम नजिकच्या पसायदान परिसरात (दि २४) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
जेव्हापासून कार्यक्रमाचे नियोजन केले तेव्हापासूनच विद्यार्थी फार उत्सुक होते. त्यांच्यातील उत्साह हा दिवसागणिक वाढतच होता. अखेर 24 फेब्रुवारी वार मंगळवार दिवस उजाडला. सकाळी नऊ वाजताच विद्यार्थी क्षेत्रभेटी करीता शाळेच्या प्रांगणात उत्सुकतेने गोळा झालेले होते. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग क्षेत्रभेटी करिता रवाना झाले.
गप्पागोष्टी करत सर्व विद्यार्थी प्रथमत: पसायदान परिसर येथे पोहोचले. पसायदान परिसर मधील सुरुवातीलाच असलेले श्रीरामाचे मंदिर लक्षवेधक आहे, तसेच तेथील निरव शांतता मनाला सुखावून टाकणारी होती. ऐतिहासिक दृष्टिकोन मनात ठेवून हे क्षेत्रभेटी योजली होती. सुरुवातीलाच शिवछत्रपतीने जिथे स्वराज्याचे तोरण बांधले त्या तोरणा किल्ल्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच त्यानंतर राजगड, रायगड, सिंहगड, सिंधुदुर्ग यासारख्या अनेक किल्ल्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास विद्यार्थ्यांच्या मनावर उमटला.
पसायदान परिसरातील भित्तिचित्रे अभ्यासपूर्ण व लक्षवेधी ठरले. ध्यान मंदिर बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना तेथे ध्यान लावता आले नाही. तिथून सरळ आम्ही लोवर वेणा प्रकल्प (वडगाव धरण) येथे प्रस्थान केले. भौगोलिक दृष्टिकोन जपत पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित धरण व धरणाचे सौंदर्य बघत विद्यार्थ्यांना धरणाविषयी व धरणाच्या उपयोगाची इत्यंभूत माहिती देण्यात आली. धरणावर असलेल्या बगीचा मधील खेळण्यावर विद्यार्थ्यांनी खेळून खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
वनभोजनासाठी धरणावरच वरण, भात, भाजी, पोळी, कढी, भजे व जिलेबीचा उत्कृष्ट स्वयंपाक करण्यात आला. विद्यार्थी , पालक, शा. व्य. समिती सदस्य तसेच शिक्षकवृंदांनी वनभोजनाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी दिवसभर खेळत, गाण्यांवर नृत्य करत मनमुराद आनंद लुटला या प्रकारे जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, रामा यांचा क्षेत्रभेट व वनभोजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाकरिता अरुण भावे सर ( विशेष शिक्षक ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजित क्षेत्रभेट व वनभोजन कार्यक्रमाला शा. व्य. स. सदस्य, आदरणीय पालक, आदरणीय केंद्रप्रमुख तसेच सर्व आदरणीय शिक्षक वृंद उपस्थित होता.



