Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अ.ता.शि.प्र, मंडळातर्फे ‘रुद्र पवार मुख्याध्यापिका सौ. वारगे’ यांचा सत्कार

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

अ.ता.शि.प्र, मंडळातर्फे ‘रुद्र पवार मुख्याध्यापिका सौ. वारगे’ यांचा सत्कार

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग ( दि, २) अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल प्राथमिक शाळेचा प्रज्ञावंत विद्यार्थी रुद्र राजाराम पवार (इ. ५वी) यानै शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत ६१-५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले शिवाय केँद्रशासनाचे नवोदय विद्यालय निजामपूर (ता माणगाव) या निवासी शाळैत प्रवेश मिळण्यासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेतही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला तसेच या प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. रेश्मा वारगे यांनी दर्जेदार शैक्षणिक व्हीडीओ, उपक्रमात जिल्हा परिषद शाळांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थी रुद्र पवार व उपक्रम शील मुख्याध्यापिका सौ. रेश्मा वारगे यांचा स्त्कार संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांच्याहस्ते संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेत करण्यात आला.

सत्कामूर्तीःचा गुणगौरव संस्थाध्यक्ष बळवंत वालैकर व संचालक तथा माजी जिल्हा सरकारी वकील अॕड. प्रसाद पाटील यांनी आपल्या भाषणात केला. सत्कारमूर्ती कु. रुद्र पवार व उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ .रेश्मा वारगे यांनी सत्कारास उत्तर दिले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी द. ल. माळवी यांनी केले. तर आभार स. शिक्षक विलास पनासे यांनी मानले.

या कार्यक्रमास संचालिका सुषमा सोमण , कु रुद्रचे वडील राजाराम पवार , आई सौ. सरिता पवार , भोवाळे प्राथ. शाळा मुख्याध्यापक
विजय नांदगावकर , उसर मुख्याध्यापक शिवाजी दराडे , कार्लै मुख्याध्यापक गुलाब काळे , पवेळे मुख्याध्यापिका सौ. साधना पाटील , वढाव मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील , लोणारे मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील , भाल मुख्याध्यापिका सौ. रेश्मा वारगे , शिशुविहार मुख्याध्यापिका सौ, कल्याणी वेखंडे , जांभूळपाडा मुख्याध्यापक सिताराम जाधव तसेच सहा. शिक्षक , समीर पाटील , मंगेश आपणकर , श्रीम. रुपा कैळी , सौ. जाग्रुती पाटील. , सु, मनिषा धसाडे तसैच पालक व विद्यार्थी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे