0
1
9
8
8
5
वाट
आहे वाट खडतर जरी
चालणे सोडणार नाही
आहे वाट प्रगतीची
एवढ्यात थांबणार नाही
काट्यांची खडतर वाट
सवय आहे पावलांना
बोचणारे असतील शब्द जरी
खंड कधी पडणार नाही
शब्दाने वाढत जातो शब्द
कळतय एवढं तरीपण
येऊ दे वादळ सैरावैरा
हे श्वास गुदमरणार नाही
होऊन वात जळले आजवर
करीन मशाल म्हणते आता
अहंम केल्याशिवाय अंत
आग ही शमणार नाही
सविता धमगाये
नागपूर
=====
0
1
9
8
8
5