0
4
8
2
9
0
भावना जपू या
क्षणभंगूर या जीवनात
शब्द जपून वापरू या
शब्दाने मने दुखावतात
म्हणून भावना जपू या….
अमूल्य असते नाते फार
स्वार्थामुळे क्षणात तुटते
हळूहळू अंतर पडून मग
संवादाचेही प्रमाण घटते…
विसरू नये कधी कोणी
वेळोवेळी दिलेली साथ
काळजातल्या नात्याचा
नको उगीच विश्वासघात…
पाठीमागे निंदा नालस्ती
तोंडावर साखरेपरि गोड
दिखाऊपणा मुळीच नको
झाकत नाही असली खोड…
आपली तशी दुसऱ्याची
हे भावनेचे गणित असते
एकदा तुटलेली भावना
पुन्हा परतून येत नसते…
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
0
4
8
2
9
0



