गायीसोबत कुकर्म, आरोपी अटकेत संतप्त नागरिकांचा युवकास चोप
अज्ञात लोकांनी आरोपीचे पेटविले दुचाकी वाहन
गायीसोबत कुकर्म, आरोपी अटकेत,संतप्त नागरिकांचा युवकास चोप
अज्ञात लोकांनी आरोपीचे पेटविले दुचाकी वाहन
नरेश रणधीर पोलीस निरीक्षक अवधूतवाडी पुढील तपास करीत आहे
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ : एकीकडे दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता मुकी जनावरेही याला बळी पडल्याचे समोर आले आहे. शहरातील भोसा परिसरातील संजय गांधी नगर येथे रात्री एक संतापजनक प्रकार घडला आहे.
एका 20 वर्षीय तरूणाने मोकळ्या जागेत चारा खात असलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्या तरूणाला चांगलाच चोप देत अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असून शेख आवेश शेख जमीर (20) रा. डेहनकर ले-आऊट असे त्या तरूणाचे नाव आहे.
दरम्यान संतप्त झालेल्या अज्ञात युवकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली युवक चारा खात असलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार करतांना आढळून आला. यावेळी नागरिकांनी आरडाओरड करताच त्याने दुचाकी घेवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी स्लीप झाल्याने तो खाली पडला, दरम्यान संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी गीतादेवी मिश्रा रा. संजय गांधी नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तरूणाविरोधात गुन्ह नोंद केले असून त्याला अटक करण्यात आली आहे.





