Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

कास्ट्राईबचा उद्याच्या एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलनास पाठिंबा; जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार

जिल्हा प्रतिनिधी, वर्धा

0 4 8 2 8 4

कास्ट्राईबचा उद्याच्या एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलनास पाठिंबा; जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार

जिल्हा प्रतिनिधी, वर्धा

वर्धा: राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या निर्णयाविरुद्ध उद्या दिनांक 25 सप्टेंबरच्या पुकारलेल्या एक दिवसीय सामूहिक रजा घेऊन मोर्चास कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा शाखेने सक्रिय पाठिंबा दिला असल्याचे कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय,5 सप्टेंबर2024 चा विद्यार्थी पटसंख्येचा शासननिर्णय, मागासवर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नतीतील आरक्षण, रद्द करणे,10-20-30 चा आस्वासित प्रगती योजना लागू करणे, सरसकट सर्व शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे, सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, समान काम- समान वेतन या धोरणानुसार सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करणे, अनुकम्पा तत्व वरील शिक्षकांना Tet अनिवार्य तेचा शासन निर्णय रद्द करणे,मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे,प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरण लागू करणे, कंत्राटी धोरण रद्द करणे, सर्व विद्यार्थ्याना मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण पुरविणे व त्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. आदीसह विविध मागण्यांसाठी सर्व प्राथमिक शिक्षक कृती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

तेव्हा जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचा-यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार जिल्हा सरचिटणीस, आकाश पाटील, नितेश काळपांडे,प्रवीण लोहे, आर पी. थुल,अनिल वानखेडे, योगीराज पाटील, उमेश फुलमाळी, अनिल वानखेडे, नितीन कांबळे, विशाल गावंडे, कैलास हाडके, श्रीकृष्ण भस्मे, गोपाळ मुन ,राजेश नंदागवली,संजय पाटील , पवन झटाले, प्रकाश बनसोड,आत्माराम पाटील,दीप नाखले,रजनीश फुलझेले,लोमेश वैद्य,विजय धवणे, मनवरे सर आदींनी केले आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे