Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

“एन एस एसचे शिबीर स्वयंशिस्तीचे व व्यक्तिमत्व विकासाचे उत्कृष्ट केंद्र”; ऍड. गौतम पाटील

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी शिबीर संपन्न

0 4 8 2 8 4

“एन एस एसचे शिबीर स्वयंशिस्तीचे व व्यक्तिमत्व विकासाचे उत्कृष्ट केंद्र”; ऍड. गौतम पाटील

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी शिबीर संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: (दि.3 डिसे.): जे. एस. एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी शिबीर दि. 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2024 रोजी दत्तक गाव नागाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले.

सदर शिबिराच्या समारोप समारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ऍड. गौतम पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी शिबीर हे विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्तीचे व व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र आहे. ही शिबीरे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व्यक्तिमत्व विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत.आपल्या मनोगताच्या शेवटी अध्यक्ष ऍड. गौतम पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी सांगितले कि, आजच्या या संगणकीय व तांत्रिक युगातून व मोबाईल च्या मोहपाशातून सुटका करून मेंदूला वेगळी चालना देण्यासाठी विद्यार्थी शिबीरात सहभागी होऊन बौद्धिक विकासाबरोबर उत्कृष्ट समाजकार्य करत आहेत. विदयार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमाबरोबर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात डॉ. प्रविण गायकवाड यांनी सांगितले कि, या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता मार्गदर्शक तज्ञाचे व्यख्यान, ग्रामस्वच्छता, श्रमदान, समुद्रकिनारे स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबीर, किमान कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण शिबीर योगाभ्यास, प्राणायाम, प्रार्थना, जनजागृतीपर रॅली, एड्स जनजागृतीपर व्याख्यान व समुपदेशन, लॅब ऑन व्हील कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, एकपात्री नाटिका, पथनाट्य,असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये सर्व विदयार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिबीर यशस्वीपणे आयोजित केले.

विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी या शिबिराची निश्चित मदत होईल असे डॉ. प्रविण गायकवाड म्हणाले. शिबीर समारोप समारंभासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ऍड. गौतम पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, नागाव रहिवासी संघांचे अध्यक्ष श्री एम. एन. पाटील, नागाव हायस्कुल नागावचे मुख्याध्यापक ए. जी. पाटील, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. अश्विनी दळवी व 150 एन एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे