Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अ‍ॅड.दत्ता पाटील विधी महाविद्यालयात “शवविच्छेदन आणि कायदेशीर तरतुदी” विषयावर सेमिनार

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

अ‍ॅड.दत्ता पाटील विधी महाविद्यालयात “शवविच्छेदन आणि कायदेशीर तरतुदी” विषयावर सेमिनार

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग:(दि.१०) अ‍ॅड.दत्ता पाटील विधी महाविद्यालयामध्ये गुरुवार, दि.१०अ‍ॅाक्टोबर २०२४ रोजी,जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॅा.साक्षी गौतम पाटील यांचे “शवविच्छेदन आणि कायदेशीर तरतुदी” या विषयावर विधी महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी.समितीद्वारे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.गौतम पाटील आणि विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सौ.नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विधी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी समन्वयक डॅा.संदीप घाडगे,प्रा.नीलम म्हात्रे,प्रा,कौशिक बोडस,प्रा.सुरज पुरी यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

डॅा.साक्षी गौतम पाटील या को.ए.सो.चंद्रकांत हरी केळुस्कर होमिओपॅथिक मेडिकल कॅालेज ,अलिबाग येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत असून त्या फोरेन्सिक मेडिसिन्सिस् अ‍ॅन्ड टॅाक्सिकॅालॅाजी विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये फोरेन्सिक मेडिसीन या विषयामधील विविध प्रकारच्या तांत्रिक संकल्पनांचे उदाहरणांसहित स्पष्टीकरण दिले.अनआयडॆंटीफाईड बॅाडी,अन नॅचरल डेथ,फिंगरप्रिंट पृथक्करण इ.संज्ञा पोस्टमॅार्टम करताना कायद्याच्यादृष्टीने किती महत्वाच्या आहेत याबाबत माहिती दिली. फोरेन्सिक सायन्सचा वापर मृत मानवी शरीराचे विच्छेदन करताना मृत्यूची वेळ,मृताचे वय,लिंग कोणत्या पध्दतीने नोंदविलेले जातात आणि त्याचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो याबाबत माहिती दिली. मृत व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हा शोध घेण्यासाठी मृत शरीरावर कोणत्या प्रकारच्या जखमा आहेत,कोणत्या हत्याराने झाल्या आहेत किंवा उपासमारीने मृत्यू झाला आहे का? ,मृत्यू नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे झाला आहे का? हे शवविच्छेदनाद्वारे कसे अभ्यासले जाते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बलात्काराच्या आणि भ्रूणहत्या केसेसमध्ये कोणत्या पध्दतीने नमुने गोळा करुन त्यांचे पृथक्करण केले जाते याविषयी मार्गदर्शन केले.गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी फोरेन्सिक सायन्स विषयाचे महत्व त्यांनी विशद केले.शारिरीक आणि मानसिक अत्याचार कोणत्या प्रकारचे असतात याबाबत त्यांनी उदाहरणासहित माहिती दिली.विधी विद्याशखेच्या विद्यार्थ्यांनी सांविधानिक आणि कायदेशीर तरतुदींसोबतच फिरेन्सिक सायन्स या विषयाची माहिती करून घेणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये शकांचे निरसन करताना शवविच्छेदन गुन्ह्यांच्या आणि गुन्हेगारांचा तपास करताना कसे महत्वाचे आहे याबाबत उहापोह केला. या सेमिनारसाठी विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.नीलम म्हात्रे यांनी केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे