Breaking
ई-पेपरकवितामहाराष्ट्रसाहित्यगंध

असे कसे

विमल धर्माधिकारी वाई, सातारा

0 4 8 3 0 0

असे कसे

असे कसे ,असे कसे
नवल वाटे जसे. Ii ध्रुवll

सुई नाही दोरा नाही
नाही हात बोटे
असे कसे पिलासाठी
सुगरण विणते घरटे .

इवलीशी टाचणी
डुबकन पाण्यात बुडते
अवाढव्य आगबोट
कशी पाण्यात तरते?

माणसाला दोन पाय
प्राण्यांना चार पाय
साप आणि गांडूळ
चालतात कसे विनापाय,?

छतावरची पाल
उलटी उलटी चालते
पडत नाही कशी
पटकन माशी पकडते.

जाळे विणतो कोष्टी
सूत आणतो कुठून
असे कसे भक्ष
जाळ्यात बसते अडकून.

विमल धर्माधिकारी
वाई, सातारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे