0
4
8
2
9
3
आई
आई आहे जीवंत तोपर्यंत
आनंद घ्या तिच्या कुशीत,
ती गेल्यानंतर
फक्त भास होतात,
रडावं लागतं
तोंड लपवून
आपल्याच उशीत.
वडील आहेत तोपर्यंत
मिरवून घ्या स्वःताला
जसा जग जिंकल्याचा
आव सिकंदराला,
ते गेल्यानंतर
त्यांची आठवण येते
प्रत्येक क्षणाला,
अन बघत बसावे लागते
फोटोतल्या चेहऱ्याला
अपेक्षा नसतेच काही
त्या दोघांचीही तुमच्याकडून..
त्यांना आधार हवा असतो
फक्त त्यांच्या शरीराला,
कारण त्यांनी जन्म दिलेला असतो
आपल्या काळजाला.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जि धाराशिव
0
4
8
2
9
3



