0
4
8
2
9
7
जीएसटी
जमवून सगळ्यांचा टॅक्स,
घातला आपल्याच गळ्यात…
वाहलेल्या पाण्याचा खेळ हा,
चालतोय तळ्यात मळ्यात…१
जीएसटीचा हा खेळ खंडोबा,
गोरगरिबांना करीते हलाल…
व्यापाऱ्यांच्या तिजोऱ्या भराया,
शासन उधळीते …..गुलाल…२
सामान्य प्रजेची होते गोची,
व्यावसायिकाची होते मस्ती…
व्यापाऱ्यांच्या त्या संपत्तीवर,
नेत्यांची तरंगतात कस्ती…३
विकासकामा नावे जीएसटी,
अर्धाअधिक पुढाऱ्या खाती…
‘सुधाकरा’ येथे सत्ताधारी,
करी निर्बल जीवनी माती…४
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========
0
4
8
2
9
7



