Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर २० येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

विलास गुलाबराव सूर्यवंशी नेरूळ, नवी मुंबई

0 5 9 4 1 4

नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर २० येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

नेरूळ नवी मुंबई सेक्टर २० श्री समर्थ कृपा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय वारसा असलेल्या घराण्यातील, नवी मुंबई उभारणीत प्रमुख योगदान असलेल्या कुटुंबातील व्यवसायिक व सामाजिक क्षेत्रातील दाम्पत्य मा.गौतम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्वेता भोपी, विक्रम काळेकर, तन्मय पवार, गीतांजली कोंडविलकर, मयुरी सूर्यवंशी इत्यादी वीस जणांचा याप्रसंगी यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना गौतम पाटील म्हणाले, “देशातील तरुणांवर देशाचे भविष्य अवलंबून असून सर्व तरुणांनी जबाबदारीने वागावे”, असे आवाहन करून राज्यातील नशाबंदी मोहिमेस जनतेने सहकार्य करावे असे त्यांनी प्रतिपादन केले. ज्येष्ठ कवी ‘विलास सूर्यवंशी’ यांच्या देशभक्ती श्रावण निसर्ग सामाजिक आणि बालकवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद देऊन सदर भरगच्च कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विलास गुलाबराव सूर्यवंशी
नेरूळ, नवी मुंबई

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे