0
4
8
3
0
0
झाड
काय सांगू बाई
झाडाची महती
आजकाल झाले
सर्वच झाडाचे चाहती
ऊन्हात हवा आहे
सावलीचा थंडावा
लपंडाव खेळात
लागतो झाड धुंडावा
झाडाने होतो
प्रदुषणाचा विनाश
शुद्ध हवा मिळून
आजाराचा नाश
गावगप्पा करीता
तत्पर झाडाचा ओटा
सरपंचाना मिळतात
फुकटच्या नोटा
वह्या, पुस्तके बनती
झाडापासून खास
अभ्यासही करायला
झाडच लावी आस
फक्त देणे शिकवी
कशाची अपेक्षा न करता
आपणही जाणुया मौल
जीवन होईल अनमोल
प्रतिभा खोब्रागडे
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
================
0
4
8
3
0
0



