0
4
8
2
9
0
छ .शाहू महाराज गौरव गीत
भीमाचे गुरुमित्र,झाले शाहू मायबाप।
राजश्रींचे भीम बा वरी उपकार हे अमाप।। //ध्रु//
हिनदीन दलितांची , दैना खूप होती।
समाजात शिक्षणाने,लाविल्या विद्याज्योती।
शिष्यवृत्ती देऊन केले, भीमाचे मोजमाप //1//
अन्यायाशी लढताना,मूकनायक अबोला।
अम्रुताची धार वाणी,बोलाया लाविला।।
अंधारी निजलेला जागे ,समाज निष्पाप //2//
शिवबाची तलवार,जशी लेखणी ज्योतिबांची
समता विचार सरणी, मानवता स्वातंत्र्याची
संविधान साक्षी आहे, विचारांचा मिलाफ//3//
बहुजनांच्या साठी कार्य ,कल्याणकारी थोर।
स्त्रियांना सन्मानार्थ ,विवाह कायदा मंजूर।।
सनातनींना भीमाचा,सुटलारे थरकाप //4//
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
=========
0
4
8
2
9
0



