Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

७७ व्या प्रजासत्ताकदिनाचा सोहळा आवासमध्ये उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 3

७७ व्या प्रजासत्ताकदिनाचा सोहळा आवासमध्ये उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग/ आवास: (दि २७): सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी भारतमातेच्या ७७ व्या प्रजासत्ताकदिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.

सर्वप्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश गिरी यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम व इ. ५ वी मधील विद्यार्थीनी अक्षरा खैरे यांनी परेड करून आमंत्रित केले व प्रकाश गिरी यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर प्रकाश गिरी यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर उपस्थितीत सर्वांनी इ. १० व इ. १२ वी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त परीक्षा शपथ घेतली. त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ५ वी व इ. ६ वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली. नंतर क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी देशभक्ती पर गीतावर सामूहिक नृत्य व विद्यार्थ्यांनी लाठी काठी प्रात्यक्षिक सादर केले.

या कार्यक्रमास आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे, कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारिणी सभासद जयवंत म्हात्रे, कार्यकारिणी सभासद अनिल राऊळ, ग्रुप – ग्रमपंचायत माजी सदस्या ज्योती पवार, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी सहाय्यक शिक्षक महादेव कोळी सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॕडम, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश गिरी व सामाजिक कार्यकर्ते हितेश भगत यांच्यातर्फे चाॕकलेट्स व बिस्किट्सचे वाटप करण्यात आले.

विद्यालयातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची शाळेपासून ग्रुप – ग्रामपंचायत, आवास पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी मध्ये देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे