
0
6
1
1
8
5
श्रावणी भक्ती
श्रावण मास हा मांगल्याचा
चैतन्याचा सुवास फुले
शंकराची श्रावणी भक्ती
तनमन भक्तीत सदा डुले
श्रावणी सोमवार भक्तीचा हा
क्षण क्षण भक्ती फुलत असे
शिवशक्तीचे पुजन करता
ह्रदयी शांती मज वसे
मंगल भावन असे हे दिन
ध्यान लागे श्रावणी भक्तीचे
निर्मळ मन हे होऊन जायी
सौंदर्य फुलत असे वसुंधरेचे
श्रावणात येई नागपंचमी
भक्ती भावे करू पुजन नागाचे
नारळी पौर्णिमेस रक्षाबंधन
फुले नाते बहिण भावाचे
येई सण गोकुळाअष्टमीचा
पुजन करू भक्ती भावे श्रीकृष्णाचे
दहीहंडी फोडून घेऊ
गीत गाऊ श्रावणी भक्तीचे
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
झिंगाबाई टाकळी नागपूर
0
6
1
1
8
5



