
0
4
0
8
9
0
घडीभराचा डाव
लाजली होती सायंकाळ
चोरून लपून भेटतांना
नजरेत तुझ्या नव्याने
भेटीचे स्वप्न पाहतांना
क्षणोक्षणी आठवाने
ते ओठ लाजतांना
काजळकाळे नयणबाण
ते मन घायाळ करतांना
किती रात्री जागविल्या
त्यातुझ्या एक शब्दासाठी
म्हणावे तू हृदय माझे
राजा फक्त तुझ्याचसाठी
चंद्रमोळी घरटे माझे
तुझा तो चांदीचा महाल
एकाच भेटीत झालो
सखे पुरता मी हलाल
तुझ्या माझ्या प्रितीचा
ठरला घडीभराचा डाव
एकच मागणे परमेशा
नको आणखी कशी हाव
सविता धमगाये नागपूर
=======
0
4
0
8
9
0





