0
4
0
8
9
0
जगण्याची कला
आयुष्याची मजा समजते,
शिकून जगण्याची कला
चेहऱ्यावर हास्य फुलवा,
दूर सारून वेदनेला ||१||
सर्कशीतला विदूषक पहा,
कसा हसवितो सर्वांला
रंगरंगोटीमागे लपलेले असते,
अंतरीच्या दुःखाला||२||
डॉक्टरांचे जीवन पहा,
सेवा देती समाजाला
कुटुंबासाठी वेळच नसतो,
वेळ तयांचा पेशंटला ||३||
घरांतील माय-तात पहा,
कशी वाढविती बाळाला
चंदनापरी देह झिजवूनी,
सुखविती घरादाराला||४||
आयुष्य खूप सुंदर होईल,
शिकून जगण्याची कला
समर्पणाने काम करु,
विसरून जाऊ स्वतःला||५||
- शारदा राहुल शिंदे
वाई, सातारा
=======
0
4
0
8
9
0





