0
4
8
2
9
0
वीर शहीद
देशभक्तीचा मनी ध्यास
देश रक्षणाची लागली आस
उरी देशाभिमान बाळगून
दिले सुखाला झुगारून
वीर मातेचे ते सुपूत्र
कीर्ती तयांची सर्वत्र
वीर पत्नीचा सौभाग्य अलंकार
काळाने नेला कसा अलवार
देशप्रेम मनी बाळगलेले
वीर शहीद ते हुतात्मे झाले
धन्य ती माता अशा सुपूत्रांना घडविले
धन्य ती पत्नी अशांना जीवनसाथी बनविले
सौ. प्रांजली जोशी
विरार, पालघर
============
0
4
8
2
9
0



