विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवारा तर्फे चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवारा तर्फे चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि ११) विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार मानेवाडा रोड येथील चर्मकार समाजाचे विविध प्रकारे सामाजिक उपक्रम मागील दोन वर्षांपासून राबविले जात आहे. त्यापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे चर्मकार समाज उपवर-वधू युवक -युवती परिचय मेळावा रविवारी 8 मार्च रोजी प्रेम (हितेश) मुंदाफळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला. विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार चर्मकार समाजातील योगदान व सहकार्य लाभले. तसेच चर्मकार समाजातील विवाहाच्या समस्या दूर झाल्या आहेत.
याप्रसंगी बंधनगाठी नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्यामध्ये उपवर वधू युवक युवतीचे यांचे फोटो -बायोडाटा, प्रसिद्धी केले आहे. यावर्षीही वधू-वरांचे नावे पुस्तिकेत होते. आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाज बांधवांचे मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवार व प्रेम (हितेश) युवराज मुंदाफळे यांनी आयोजन केले होते.
माजी सभापती राजकुमार नागुलवार व तसेच दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डायमंड भशाखेत्रे, रामदास पोरटकर, महादेव बोडखे, प्रविण इंगोले, पवन इंगोले, चतुर्भुज हरसुलकर, हिमेश इंगोले, प्रियाताई मुंदाफळे, पायल इंगोले, दिव्या इंगळे, हर्षा इंगळे, प्रभा इंगोले, सुनीता इंगोले यांच्यासह अनेकांनी उपस्थिती दर्शविली.



