Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनखानदेशविदर्भसाहित्यगंध

शिक्षकांना मिळालेली नवी ऊर्जा, नवा दृष्टिकोन

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन

0 4 0 8 1 5

शिक्षकांना मिळालेली नवी ऊर्जा, नवा दृष्टिकोन

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई महाराष्ट्र राज्य आयोजित शिक्षकांसाठी राज्यस्तरिय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षकांना अध्ययन अध्यापनाचा नवा दृष्टिकोन प्रदान करते. शिक्षकांना अध्ययन अध्यापनाचे नवे प्रवाह ,तंत्रज्ञानाचा वापर, कृतीआधारित अनुभवात्मक शिक्षण,कला क्रीडा एकात्मिक अध्यापन कृती या नाविण्यपूर्ण कौशल्य वृध्दीसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही शिक्षकांना मिळालेली एक नवी ऊर्जा आहे. नवा दृष्टिकोन आहे. शिक्षकांनी कुठल्याही शैक्षणिक उपक्रमात सकारात्मक दृष्टिने उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला पाहिजे.विद्यार्थी हितार्थ ऊत्कृष्ठतेचा ध्यास घेऊन केलेल्या चांगल्या कामास यश निश्चितच मिळत असते.

नंदुरबार जिल्हयातून साधारणत: ६५० शिक्षकांनी स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला. सुमारे ३०३ शिक्षकांचे व्हिडिओंची २८ गटातून तालुकापातळीवर निवड झाली पैकी ७२ व्हिडिओंची जिल्हास्तरावर उत्कृष्ठ शैक्षणिक व्ह़डिओ म्हणून विविध गटात प्रथम द्वितीय व तृतीय अशा क्रमनूसार निवड झाली.बहुतेक व्हिडिओ राज्यपातळीपर्यंत पोहचले आणि यशस्वी झाले. या सर्व तालुका , जिल्हा व राज्यपातळीवर विजेता पारितोषिक प्राप्त शिक्षकांचे मन:पुर्वक अभिनंदन ! तसेच सर्व सहभागी शिक्षकांना शुभेच्छा ! शिक्षक स्वविकास,दैनंदिन अध्ययन अध्यापन आनंददायी व मनोरंजनात्मक होणेसाठी उपक्रम, प्रकल्पाधारित अनुभवात्मक शिक्षण होणेसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्वाच्या आहेत. विविध क्लिष्ट संकल्पना आशय विविध कृती तंत्रज्ञान कौशल्याचा वापर करुन विद्यार्थ्यापर्यंत सूलभपणे पोहचविणेसाठी अशा प्रकारचे अध्ययन अध्यापन आधारित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती हा उत्कृष्ट उपक्रम आहे.

आपले ज्ञान कौशल्य सर्वदूर पोहचविणेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या ध्येय धोरणानुसार येत्या काळात व्यवसाय शिक्षण, तंत्रज्ञान आधारित शिक्षण, डिजिटल तसेच आॅनलाइन शिक्षणाचे महत्व लक्षात घेता दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती होणे हि भविष्यकाळाची गरज आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुबारच्या परिवाराने हा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती उपक्रम स्पर्धा जिल्हाभरात अगदी धडगाव सारख्या सातपुडाच्या दुर्गम अशा दरी डोंगररांगेतही यशस्वीपणे राबविली. संपूर्ण जिल्ह्यातून शिक्षकांमध्ये प्रेरणेची ज्योत पेटविली आणि जास्तीत जास्त शिक्षकांना प्रोत्साहित केले. जिल्ह्यातील सहाही तालक्यांमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. नंदुरबार डायट परिवाराचे आदरणीय प्राचार्य डाॅ.राजेंद्र महाजन साहेब यांनी शिक्षकांच्या या कामाची खास दखल घेऊन शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन सभागृहात गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी शानदार असा पारितोषिक प्रदान सोहळा आयोजित केला.

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील जिल्हा स्तरीय बक्षीस वितरण व गुणगौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रमोद पवार (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी) होते. मा.डॉ. राजेंद्र महाजन (प्राचार्य,डायट), मा.भानुदास रोकडे (शिक्षणाधिकारी प्राथ.), मा.डॉ. रमेश चौधरी (वरिष्ठ अधिव्याख्याता), मा.डॉ. वनमाला पवार (अधिव्याख्याता), मा.डॉ.बाबासाहेब बडे (अधिव्याख्याता), मा.डॉ.युनूस पठाण (उपशिक्षणाधिकारी). मा.प्रदिप पाटील (अधिव्याख्याता), मा.रमेश चौरे (गटशिक्षणाधिकारी), मा.शेखर धनगर (गटशिक्षणाधिकारी) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  विजेत्या पुरस्कार्थी शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला.या कार्यक्रमातून जिल्हाभरातील शिक्षकांना ऊर्जा मिळाली.कामाला दिशा मिळाली.मने प्रेरणेनं भरुन गेली, उत्साह संचारला. असा हा अभूतपूर्व नियोजनबध्द व शिस्तबध्द दिमाखदार कौतुक सोहळ्यातून शिक्षकांना मिळालेली शाबासकीची थाप आणि प्रेरणेची हाक नंदुरबार जिल्हयातील शिक्षक कदापि विसरु शकणार नाही. त्याबद्दल नंदुरबार डायट परिवाराचे मन:पूर्वक धन्यवाद!!

गणेश नरोत्तम पाटील (पर्यवेक्षक)
नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित,
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा बु।
ता.शहादा, जि.नंदुरबार
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 1 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
06:57