0
4
8
2
9
7
जुगाड
झरे सारे खोदून काढू
उधारीही फेडून काढू
मोसम जरी लाचारीचा
माळ सारा भरून काढू
ताबा सारीकडं चोरांचा
अन् मेंदूही सडका यांचा
ठेचून काढू विषारी साप
जरीसे वारा लुटारूंचा
नियतीचाही खेळ मोडू
हात मात्र नको सोडू
पहारे भवती कितीही
जोखडही तोडून काढू
झालीसे जरीही मोडतोड
करू जुगाडाची तडजोड
माघार नको घेऊस मित्रा
लढायचेच तर सडेतोड
पंख लेवूनी नभात जावू
क्षितीजाला कवेत घेवू
आली जरी किती काजळी
दीपकळी मनी फुलवू
दुःख सारी वाटून घेऊ
नैराश्याला पळवून लावू
करू सारा जुगाड दोस्ता
स्पप्ने सत्यात आणून दावू
सविता पाटील ठाकरे
सिलवासा
0
4
8
2
9
7



