0
4
8
3
0
0
माझी पाककला: बीट पचडी
साहित्य: एक मोठी वाटी किसलेला बीट. एक चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ, दोन ते तीन हिरव्या मिरचीची पेस्ट, चार ते पाच लसण पाकळ्या चिरलेल्या, जिरे, मोहरी, फोडणीसाठी एक चमचा तेल, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, एक छोटा चमचा साखर इत्यादी.
कृती: कढईत तेल गरम करून त्यात लसण, मोहरी, जिरे घाला. मिरची पेस्ट घालून चांगले परतवा. ती फोडणी किसात घाला. नंतर त्यात लिंबूरस, मीठ व साखर घालून नीट मिक्स करा. खाण्यासाठी तयार बीटची गुलाबी पचडी. ही रेसीपी दोन ते तीन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
========
0
4
8
3
0
0



