Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

एन. एस. एस. कॅम्प मध्ये अलिबाग- मुरुड मेडिकल असोसिएशन मार्फत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

एन. एस. एस. कॅम्प मध्ये अलिबाग- मुरुड मेडिकल असोसिएशन मार्फत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग दि. 30/11/2024 आज जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एन. एस. एस. कॅम्प मध्ये अलिबाग- मुरुड मेडिकल असोसिएशन मार्फत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा व अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या सचिव डॉ. साक्षी पाटील, अलिबाग – मुरुड मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ. सुनीता पाटील, उपाध्यक्षा डॉ. रेखा म्हात्रे, मेंटर डॉ. अर्चना पाटील, डॉ. सुहानी पाटील, डॉ. प्रियांका नाईक तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, डॉ. कपिल कुलकर्णी प्रा. चेतना पाटील व एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. गौतम पाटील यांनी सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुनीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, विदयार्थ्यांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे व वेळोवेळी आपल्या आरोग्य तपासणी करून घ्याव्यात असे आवाहन केले.

डॉ. साक्षी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि विदयार्थ्यांनी आपल्या आहारात जंक फूड टाळावे व सकस आहार घ्यावा जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहील.

यानंतर विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी अलिबाग -मुरुड मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक निदान केले व योग्य ते औषधोपचार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अश्विनी आठवले यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रेया अधिकारी या विदयार्थीनीने केले तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे