जे. एस. एम. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उन्मेष-2025 उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उन्मेष-2025 उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि २४ डिसे.): जे. एस. एम. महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य, नाटय, विविध स्पर्धा व डेज यांनी नटलेले वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात उन्मेष -2025 उत्साहात संपन्न झाले. वार्षिक स्नेहसंमेलानाचे औचित्य साधून जनता शिक्षण मंडळाच्या वतीने अलिबाग नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. अक्षया नमिता प्रशांत नाईक, नगरसेविका डॉ. साक्षी गौतम पाटील व अॅड. निलम किशोर हजारे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पैठणी देऊन करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला, पोस्टरमेकिंग, फोटोग्राफी, मेहंदी, पाककला, रांगोळी, पुष्परचना, बीजीएमआय अंडरडॉग्ज गेम्स, विज्ञान प्रदर्शन, ट्रेजर हंट गेम्स इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. तर संगीत, नृत्य, नाटय, लाठी-काठी, पथनाट्य अशा विविध सांस्कृतीक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मनमुरादपणे आनंद लुटला. तसेच रोज डे, चॉकलेट डे, साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे असे विविध डेज साजरे करण्यात आले. ट्रॅडिशनल डेच्या निमित्ताने एन. एस. एस. च्या विदयार्थ्यांनी पारंपारीक वेशभूषा करून आई एकविरा देवीची पालखी मिरवणूक ढोल ताशाच्या गजारात उत्साहात काढली.
विविध स्पर्धाचे उदघाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील यांच्या हस्ते दि. 22 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन नवनिर्वाचित नगरसेवक व जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालिका श्रीमती शैलाताई पाटील व जे. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय समितीचे सदस्य श्री आर्य पाटील उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत, नृत्य, नाटय या विविध कार्यक्रमात पारितोषिक प्राप्त केलेल्या व उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले
या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक मा. श्री अनिल चोपडा व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्रचार्य डॉ. प्रविण गायकवाड, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष डॉ. निळकंठ शेरे, उपकार्याध्यक्ष सौ. संगीता गाढे, पर्यवेक्षक श्री अजय सावंत, जनता शिक्षण मंडळाचे कायदेशीर सल्लागार अॅड. सचिन जोशी उपस्थित होते.
श्री अनिल चोपडा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सांगितले कि विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्राध्यापक हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. तसेच ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी जर शिक्षणाबरोबर इतर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेतला तर निश्चित यश प्राप्त होते. आपल्या मनोगताच्या शेवटी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि जे. एस. एम. महाविद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अग्रेसर असते. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपले कलाविष्कार सादर करतात, त्यामुळे हे स्नेहसंमेलन म्हणजे कलाकार घडविण्याचे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे असे मत अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील यांनी व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात वार्षिक स्नेहसंमेलनात घेतलेल्या विविध कार्यक्रम व स्पर्धाची माहिती दिली व पारितोषिक वितरण सोहळ्याची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संयोगी नाईक, प्रा. अश्विनी आठवले, प्रा. हर्षला महाजन व प्रा. सानिका घरत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निळकंठ शेरे यांनी केले.
यावेळी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसले. वार्षिक स्नेहसंमेलन उन्मेष-2025 चे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष डॉ. निळकंठ शेरे उपकार्याध्यक्ष सौ. संगीता गाढे, रायगड जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. श्वेता पाटील, प्रा. सिमंतीनी ठाकूर, सर्व सदस्य, विद्यार्थी प्रतिनिधी कु. संयोगी नाईक, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.



