
0
4
8
2
8
4
खेळ नशिबाचा
स्वप्न उराशी बाळगून
पदवी शिक्षण घेतले
स्पर्धा परीक्षा तयारीने
नयन माझे रे त्रासले
वाढते वय व अपयश
मनात खूप सलतंय
वेडं मन माझं अजूनही
खडतर वाट ही चालतंय
आशेचा किरण जेव्हा
येतो प्रकाशित होऊन
नशिबाचा खेळ चालतो
हसतो वाकुल्या दाऊन
वारे घोंघावत आले हे
कसे खाजगीकरणाचे
मन झुरतंय माझे आता
शल्य मनी रे स्वप्नभंगाचे
खेळ नशिबाचा देईल का
यशाचे फळ मज जीवनी
झटकून निराशा घेईन कष्ट
नंदादीप यशाचा चमकवेन मी…
नंदादीप यशाचा चमकवेन मी….
दत्ता काजळे, ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
0
4
8
2
8
4



