बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*🥀विषय : संघर्षगाथा🥀*
*🍂बुधवार : ०३/ सप्टेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संघर्षगाथा*
छत्रपती शिवराय आणि सईबाईंच्या पोटी जन्मला
स्वराज्याचा, शौर्याचा वंशज पुरंदरी प्रकटला
14 मे 1657 ला तेजोवलयासह या बालकाच्या भाळी
सटवीने जणू आजन्माचा संघर्ष कोरला….
स्वराज्य स्थापनेच्या धामधुमीत
शंभू प्रवीण जाहले युद्धनीतीत
गनिमी कावा आणि मुत्सद्देगिरीत
बाळराजे घडले जिजाऊंच्या शिकवणीत….
अवघे नऊ वर्षांचे वय कोवळे
औरंगजेबाच्या दरबारी सोहळे
पडले कसे चक्रव्यूह न कळे
दाखवून धैर्य, शौर्य गाजवले आगळे…
तेजस्विता झळकली साऱ्या नात्यांत
पारंगतता मिळविली सात भाषांत
‘बुधभूषण’ काव्य मुकुट व्यक्तित्वास शोभिवंत
उण्या दुण्या हेळसांडीची नव्हती कधी खंत….
शिवरायांच्या निधनाचे दुःख अनावर
परी संघर्षाचे गारुड होतेच शंभूराजांवर
राजारामास समजावून तोडगा शोधला या कलहावर
बुद्धिमत्ता अन् धैर्याने बैसले सिंहासनावर….
कठोर स्पष्टवक्ता, छत्रपती असा धोरणी
पोटशुळ स्वार्थाचा उठतसे, दुश्मन बेईमानी
षडयंत्र अन् गृह कलहाचा संघर्ष अखंड
स्वराज्याच्या रक्षणार्थ छावा लढतो प्रचंड…
दगाबाजांची अशी अभद्र करणी
कवी कलशासह, संभाजी अडकले एका फितूरक्षणी
पुढचा संघर्ष धर्मांतराचा लढले
धर्म रक्षण्या या शुराने आयुष्य अर्पिले….
निडर छत्रपती , आजन्म लढला
अमानुष अत्याचाराला ना हरला
शत्रूही या शौर्यापुढे नतमस्तक जाहला
नसे की केवळ वीरकथा,
ही तर मृत्युंजयाची संघर्षगाथा !
*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
हुलकावणी पावसाची,होत्याचं नव्हतं झालं
हिरवंगार शेत,पार सुकून गेलं…१
जगाचा पोशिंदा,धुळीला मिळाला
केली दुबार पेरणी, डोंगर कर्जाचा वाढला..२
पहाटेच उठे राजा, मनी विचाराचं काहूर
जगाचा पोशिंद फिरे, घेऊन दावणीचा दोर..३
अरे एकदा तरी पहा, वावरात येऊन
माह्या राजाची जिंदगी, पहा एकदा जगून…४
नको कुणाची भीक त्याला, हवा घामाचा दाम
नको पुरस्कार त्याला, हवा मालाला हमीभाव..५
हा कृषिप्रधान देश, तरी का?त्याला उपवास
याचा करून विचार, त्याचे आणा दिवस..६
कुणाचा ही असावा झेंडा, जगाचा पोशिंदा सुखी व्हावा
त्याची ऐकून संघर्षगाथा, मालाला रास्त भाव द्यावा..७
*श्री पैठणकार.के.आर,नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
गाथा संतांनी मांडली
समाजाच्या संघर्षाची
शिकविण्या जीवन जगणे
धडपड होती संतांची
तुकोबांनी मांडली व्यथा
अभंगातून समाजाची
अमरत्व प्राप्त त्यांना
गाथा त्यांच्या अभंगाची
समाजापुढे ज्ञानेश्वरी
मांडली संत ज्ञानेश्वरांनी
जागृत समाज करायला
किती सोसले भावंडांनी
तुकोबाची ग्रामगीता असे
उद्धार गावाचा करण्या
भजनातून मांडली व्यथा
ग्रामराज्य सुखी करण्या
गावासोबत स्वच्छ मन
करण्या गाडगेबाबा फिरले
गावागावात जाऊन त्यांनी
कीर्तनातून प्रबोधन केले
संत नामदेव, चोखोबा,
कान्होपात्रा, जनाबाई
संघर्षगाथा ऐकताना
डोळे माझे ओले होई
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्ष गाथा*
इ.स. 1670 सालात
शूर मराठा साम्राज्यात….
सेनापती पराक्रमी होता एक…
जणू रत्न तो दरबारातील…..
नरवीर तानाजी मालूसरे हो जी जी जी…….. ।।
एका दुर्गम कड्यावर
कोंढाणा किल्ला होता एक मजबूत….!
उंच टेकड्या आणि पातळ कडा… सभोवार…..त्याला दोनच होते प्रवेशद्वार…!
कल्याण आणि पूणे दरवाजा…..हो जी जी…।।
राजपूत सूर्यभान राठोड
शूर,चालाक त्याचा किल्लेदार….!
दिमतीला 1500 हशमांची होती फौज
होते त्याला दोनच प्रवेशद्वार कड्यावरून चढणे होते अवघड हो जी जी जी….।।
कोंढाणा सर करण्याचा
त्यानी विडा होता उचलला…
लग्न मुलगा रायबाचे सोडून
केवल 300 मावळ्यांची सैन्यतुकडी घेवून…
निघाले मावळे कडा चढण्यास…
कित्तेकांचा तिथेच झाला कडेलोट…
तरी ना तानाजी डगमगले हो जी जी जी ….।।
मराठा आणि मूघल सैन्यात
युद्ध सुरू झाले मोठ्या जोरात
कित्येक शव पहले धरातिर्थी…
कुठे शीर तर कुठे दिसती हात
सूर्यभान झाला कासाविस
त्याने तोफ नागीणीचे वळविले रायगडास…
तसीच तानाजीने घेतली त्याकडे झेप…हो जी जी जी…।।
नाचू लावल्या ढाल तलवार…
सूद स्वतःची नव्हती इथे कुणास
अशातच तानाजीची तुटली ढाल
वार बसला सरळ हातावर
हात अर्धा पडला.. धरनीवर
तानाजीने झेलते कित्येक वार..
अंगावर …डीक्याचा शेला सोडून बांधला तुटलेल्या हातावर
तरी ना डगमगले..तानाजी हो जी जी जी….।।
लाथीने सूर्यभानास पाडले खाली…
जखमी हाताने मुंडी दाबली
अन् वांधली तोफेवरी…
सपासप वार केले छातीवरी
कड्यावरून तोफ दिली… ढकलूनी…
भगवा झेंडा रोवला गडावर
आणि मगच त्यांनीच सोडला श्वास ….अश्रृ भरल्या डळ्याने वदले शिवाजी महाराज ……”गड आला पण सिंह गेला हो जी जी जी ।।
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
अज्ञानाच्या क्षितीजावर
सहस्ररश्मी हो प्रकाशला
दीन दलितांचा उध्दारक
हा महामानव जन्मा आला
गरीबीच्या छायेत जन्मला,
वाढला
उपेक्षिताचे जीणे जगला
शिक्षणाचे शस्त्र करी घेऊनी
अज्ञानाचा तम तयाने भेदला
ज्ञान क्षितीज काबीज केले
बुध्दीच्या तेजाने जगी तळपले
अन्याया विरुद्ध दंड थोपटूनी
समतेचे बुध्दविचार अंगिकारले
देशाचे संविधान त्यांनी लिहिले
मानवतेचे भान जगा दिधले
चवदार तळे करूनी खुले
इतिहास कीर्तीचे तयांनी रचले
जातीभेदा तिलांजली देऊनी
दीन दलितांना न्याय दिधला
स्वाभिमानाचे तेज देऊनी
शिक्षणाचा वसाच दिधला
महामानवाची ही संघर्षगाथा
प्रेरक शक्ती अभिमानाची
वंद्य साऱ्या जगता झाली
ज्योत जागती ही कर्तृत्वाची
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*संघर्षगाथा*
आठवून ती शूरवीरांची संघर्षगाथा,
नमवावा तया चरणी आदराने माथा..
भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर,
गोळ्या झेलल्या त्यांनी छाताडावर..
पर्वा केली ना कधी स्वतः जीवाची,
आहुती दिली बाजी लावी प्राणाची..
ऊन वारा पाऊस झेलला अंगावर,
तुटून पडले रणात लढतांना शत्रूवर..
देशभक्ती भिनली आहे नसानसात,
देशासाठी बलिदान सार्थ जिवनात..
संघर्षमय जीवन जगायचं ठरवलेले,
वादळवारा संकटाला ना जुमानीले..
खडा पहारा दिला अहोरात्र सीमेवर,
वाकडी नजर पडू दिली ना देशावर..
बाजी लावली सीमेवरती सैनिकांनी,
पिटाळून लावत फौज शत्रू सैन्याची..
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
इतिहासाच्या पानावर, कोरली जावी संघर्षगाथा
येणाऱ्या कैक पिढ्यांचा, झुकला जावा माथा..
पुत्ररत्न शिवरायांनी केले, मातेचे स्वप्न साकार
अथक संघर्षानेच लाभला,स्वराज्याला आकार..
बहुजनांचे उद्धारकर्ते, शाहू महाराज दृष्टे राजे
सामाजिक परिवर्तनाचे, खरे संघर्ष कार्य गाजे..
सावू जोतिबांच्या संघर्षाला, नसे अंत ना पार
नारी जातीच्या उद्धाराचे,ठरले खरे शिल्पकार..
शिका, संघटित व्हा, आणि उठा संघर्ष करा
बाबासाहेबांनी जगाला, तारकमंत्र दिला खरा..
अनेकांच्या माथ्यावर, धरली पदराची सावली
संघर्षयात्री सिंधूताई, होई अनाथांची माऊली..
आनंदवनाचे ऋषिवर्य, संघर्षाची करूण कथा
कुष्ठरोग्यांचे बनून सेवार्थी,बाबांनी हरली व्यथा..
आज सार्या महाराष्ट्राने, पाहिला संघर्षयोद्धा
सामान्यांच्या हितासाठी, लढतोय मनोज दादा..
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
जखमा हसत झेलल्या रक्ताने लिहिली कथा,
वादळाशी भिडलो मायभूला टेकला माथा.!१!
अंधार मोडून पुढे निघालो स्वप्नांनी दिला आवाज.
तुटलेले धागे जोडत गेलो बांधला विश्वास.!२!
घामातुनी सोनं काढले, अश्रूची केली ढाल.
दगडामध्ये मार्ग कोरत स्वातंत्र्यास्तव केली चाल.!३!
नाही कुणी अडवू शकले, नाही कुणी मोडू शकले,
मायभूसाठी संघर्षातून रोजच नवे देशभक्त जन्मले.!४!
संघर्ष आमुचा दीप झाला,जाहल्या संघर्षगाथा.
संघर्षानेच इतिहास रचला,जाहल्या
संघर्षकथा .!५!
*प्राजक्ता खांडेकर*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सुगत नगर नागपूर*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
ओसाड माळरानावरती
शाळा इवलीशी फुलली
फाटकी भिंत झिरपूनही
आशेची ज्योत न विझली
अभावांचा डोंगर वाटेला
नव्हती कुठे साधनांची साथ
विद्यार्थ्यांचा आनंद बघुनी
चालू लागलोय नवी पाथ
सहकार्यांची घामझीज,
शिक्षकांचा अपार ध्यास,
प्रत्येक अडचण पेलताना
वाढत गेला आत्मविश्वास।
विविध उपक्रम, स्पर्धांनी
दारी उजेड पसरविला,
ज्ञानदीपाच्या प्रकाशाने
गावास अभिमान मिळविला।
हीच आमुची संघर्षगाथा,
मेहनत, जिद्द, आत्मभान,
स्वप्नांना दिली उंच भरारी,
शाळा झाली प्रगतीस्थान।
*कु माधुरी घनश्याम कावडे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
आयुष्याची संघर्षगाथा माझ्या
स्वतःच लिहिन म्हणतो
किती अघोरी वार सोसले
देहाचा कण कण कण्हतो
आयुष्याच्या वाटेवर संपूर्ण
फक्त संघर्ष पेरला होता
चिंता, व्यथा जाणिवांनी
हरेक क्षण घेरला होता
संघर्ष होता जरी पाठीशी
नाही केली कधी तमा
धीरोदात्त लढवय्या बाणा
बाळगले नित्य संयमा
प्रत्येक टप्प्यावर आयुष्याने
दिले खडतर अनेक धडे
फिरलो ना माघारी परंतू
ना पडले कधी साकडे
केला संघर्ष नेटाने मी
लढण्यास हेच युद्ध
जागृत ठेवली मनोकामना
शाबूत होती शुद्ध
यशोशिखरी विराजमान मी
आठवतो जुनाच संघर्ष
होतो वेदनांचा अजूनही
मला आगंतुक स्पर्श
संघर्षानेच दिले संजीवन
विनम्र राहिला माथा
सुफळ संपूर्ण वदलो आता
मी माझीच संघर्षगाथा
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*मु.पो.रोहोकडी,*
*ता.जुन्नर, जि पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
परिक्षेतील यशात त्याच्या
घर नाचला आनंदात..
सोनेरी स्वप्न किरनात
उजळायची हर प्रभात..
शुभेच्छांच्या वर्षावात
ठेंगणे वाटे आकाश..
शब्दही वाटती थिटे
लेकाच्या अभिमानास..
प्राक्तन उजाळल्याचा
होई हर घडी अहसास
क्षणात का देवा असा
पलटविलास तू फाश..?
आता तर लेक माझा
सज्ञान होता झाला.
सांग ना, कुठे देवा
त्याला तू अज्ञात केला?
उलटून गेला पंधरवडा
अजून नाही थांगपत्ता
आशा नि निराशेची
रोज चालते संघर्षगाथा
थांबता थांबेना देवा
ही घालमेल काळजाची
संघर्षगाथा ही ममतेची
नि मेंदूतील विचाराची
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
*संघर्षगाथा*
हे जीवन माणसाचे, जगणे असेच आहे।
संघर्षाविना आयुष्य, खरे मरणेच आहे।।
संकटे अन वेदना , आहे अम्रुताची माता।
तुका म्हणे हिच खरी, जीवनी संघर्षगाथा।।
मानवा का कळेना , तुझ्या निष्ठूर मनाला।
प्रसव यातनेविना ,जन्म नाहीच कुणाला।।
जन्म मरणाचे तरी,लोक पाळते सुतक।
जगावया कर्म करा,सम्यक शुद्ध अथक।।
कोणी होतो तथागत,होई सन्मार्ग वाल्मिक।
मानवता नांदावया , करे संबोध तात्विक।।
दुःखीतांच्या सेवेसाठी, आयुष्यास झिजवावे।
तिमिरात सुखासाठी , ज्ञानदीप चेतवावे।।
भीमराव भूषणची , किर्ती जगात नांदते।
एक संविधान देतो, दुजा आचार सांगते।।
मोहमाया सोडून दे , माणूसकी आता पाळ ।
माणूस होऊनी जोड , चांगुलपणाची नाळ।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा जि. यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



