कवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
गुरुपौर्णिमा; बळवंत डावकरे
0
1
8
3
2
1
गुरुपौर्णिमा
मिळतो आकार जीवना
सार्थक होय आयुष्याचे
असे महात्म्य किती थोर
माझ्या आदर्श गुरुजींचे
अंधारल्या या वाटेवरती
दावती प्रकाश ज्ञानाचा
त्यांच्याप्रती कृतज्ञता
सण आला गुरुपौर्णिमेचा
माय-बाप बहिण-भाऊ
सखा होती प्रसंगानुरूप
किती वर्णावी ती महती
येतसे या मनाला हुरुप
गुरु-मास्तर-शिक्षक
अशी नानाविध नावे
आपुल्या या जीवनात
त्यांची स्मृती उरी ठेवावे.
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
===========
0
1
8
3
2
1