शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*☄विषय : होकार देऊन पहा☄*
*🍂शनिवार : १८/०१ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*होकार देऊन पहा*
सगळे रान गोळा करील,
जरा *”होकार देऊन पहा”*…
होकार देता कमी पडेल,
तुला पसंतीच्या दिशा दहा…१
जीवापेक्षा अधिक जपतो,
केवळ तुझ्यासाठी खपतो…
सावलीत तुला ठेवावया,
प्रखर उन्हामध्ये तपतो…२
हवे जे जे तुला मिळावेत,
जपली एवढीच अपेक्षा…
करू नकोस माझी गडे तू,
विनाकारण उगा उपेक्षा…३
अर्पिले तुज सर्वकाही मी,
फक्त एकच ती अभिलाषा…
माझी व्हावी एवढीच मनी,
रूंजी घाले *”सुधाकरा”* आशा…४
रूंजी घाले *”सुधाकरा”* आशा…
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
प्रीत जडली तुजवरी
तुझीच झाले प्रितवेडी
भाळले मी तूजवरती
लागली तुझीच गोडी
कसे सांगू तुला सख्या
तुजवीण सुचेना काही
तू होकार देऊन पहा
कळेल तुज सर्व काही
अधीर ऐकण्या होकार
मी श्र्वास रोखून धरला
प्रेमाने तुला पाहतांना
जीव माझा रे वेडावला
होकार मिळताच तुझा
आकाश ही ठेंगणे वाटे
सहवास वाढत जाऊन
हृदयात प्रीतभाव दाटे
तुझ्या एका होकाराने
मन हे प्रफुल्लित झाले
साकारले स्वप्न प्रियाचे
जे मनात होते दडलेले
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
वाईट कामाला नकार देऊन पहा
चांगल्या कामाला होकार देऊन पहा
समाधानाची झोप काय असते? ,
गड्या..एकदा झोपून तर पहा..||धृ||
खूप पलटली असतील आजवर
इकडची पाने तिकडे,तिकडची इकडे
कधी टेबलावरून,कधी टेबलाखालून
सरकल्या असतील नोटा खिशाकडे..
काळ्या भुतकाळाला सोडून त्या
गड्या ईमानदारीत वाकून तर पहा..
टाकला असेल आजवर तुम्ही
कचरा चौफेर कुठेही इतरत्र. .
वाटलेही नसेल वाईट मनाला
जराही त्यावेळी तिळमात्र..
पण आता सोडून गबाळ वागणं
कचरा कचरापेटीत टाकून तर पहा..
बकासुरासारखा आजवर तुम्ही
ओढला असेल स्वार्थचा गाढा..
उपजत नसेलही कदाचित
तुमच्यात तो दानित्वाचा पाढा
पण,बदल घडू शकतो जिवनात
वाल्याचा वाल्मिकी वाचून तर पहा..
आजवर कदाचित तुझ्या नजरेला
पर स्त्रीत दिसली नसेल आईबहिण..
आले असतील मेंदूत तुझ्याही
कुविचार ते विकृत हिनदिन
त्या मेंदू नजरेला जिजाऊ संस्कारात
स्त्री आदराचे शिवमहात्मे जगवून तर पहा..
गड्या समाधानाची झोप झोपून तर पहा
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
मिटून घेणे स्वतःला
तुलनेने सोप्प असत
होकार देऊन पहा जगण्याला
जगणं इतक वाईट नसतं
आपल्या क्षमतांची परिक्षा
होते प्रत्येक वाटेवरी
परंतु संघर्ष यशाचा करणे
हीच अनमोल अनुभुती खरी
मनुष्यजन्म घेतला आहे
तर सिद्ध कर स्वतःला
अपयश आले तर खचून
नको लटकू फासाला
छोटी छोटी पाऊले टाकून
साध्य कर ध्येयाला
अडथळ्यांचा प्रवास तुझा
प्रेरणा देईल जगण्याला
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
तुझ्या प्रेमासाठी सखे
आतुरले माझे मन
रोज तुला पाहुनिया
तृप्त होतात नयन
तुझ निखळ हसणं
मोहविते ग मनाला
रूप तुझं हे देखणं
भुलविते अंतराला
माझ्या स्वप्नांची आहे
तूच जीवनात राणी
बांधू लगीनगाठ ग
मांडू संसार साजणी
नको म्हणू ग तू नाही
नको तोडू या मनाला
होकार देऊन पहा तू
उधाण येईल आनंदाला
तूला पूजितो हृदयी
मनमंदिराची ज्योत
जगण्याची तू उमेद
उभा वाट न्याहाळत
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देवून पहा*
सागर होईन तुजसाठी
फक्त होकार देवून पहा
तू ही फक्त माझ्यासाठी
सरिता होवून धावत रहा.. //
तू लाडकी पर्वत कन्या
प्रवेश करताच किनारी
उगम ते संगम परिपूर्ण
तपस्येची सांगता न्यारी.. //
गिरीकंदरी वेडावाकडा
किती खडतर असे पंथ
मज समीप येताक्षणीच
होशील सखे शांत संथ..//
तू ऐकूनी माझी गर्जना
बावरशील थोडी मनात
हा स्वागताचा नजराणा
बघून सावरशील क्षणात.. //
धडधडत्या उरात दाटेल
थोडी अनामिक हूर हूर
कुशीत माझ्या शिरताना
होशील लाजेने चूर चूर.. //
अनुपम संगम सोहळा
अनुभवता देहभान हरेल
किती दूरचा प्रवास तुझा
शिणभाग ही सारा सरेल.. //
जाईल तनमन विरघळून
प्रणय सुखात नहाताना
माझेच घेशील रंग रूप
सर्वसमर्पण अनुभवताना.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
अंतरात सदा आळवते
तुजवरी प्रीत फुले उधळते
होकार देऊन पहा ना
सौख्याचे इंद्रधनू रे सजते
मनात सख्या तुझी आस
माझ्या भवती तुझेच भास
देह व्यापूनी झुरत राहणे
तुझिया साठी सारे श्वास
तुझ्याविना कोमेजताना
डोळ्यात वाट रे तुझी
झळा उन्हाच्या जाळताना
मनी चिंब भेट रे तुझी
बरस शत जलधारांतून
आर्त साद मी घालते रे
जादूभरा स्पर्श तुझा नी
अंगांगी मयूर पिसारे
आर्जवे करू रे किती मी
होकार देऊन पहा ना
सर्द हळव्या तव मिठीत
मज तृप्त होऊ दे ना
पर्जन्या बरस आवेगाने
पेरत तुलाच या कुशीत
स्वप्ने हिरवी ही रुजतील
अंकुरतील रे या मातीत
पाऊस भिजल्या मातीचे
गंध भारले हे उखाणे
युगानुयुगे सूरसाज लेवूनी
चिंब भिजले अक्षय गाणे
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
होकार देऊन तर पहा, क्षितिज नवे खुलेल,
गूढ भावना ओळखत, मन तुझे बोलेल..
एक पाऊल पुढे टाक, स्वप्नांना वाट मिळेल,
आणि थांबलेल्या श्वासांना, नवा सुर गवसेल..
प्रकाशमय होतील दिशा, अंधार तुटून जाईल,
दुराव्याच्या सावल्यांवर,चांदणे उमलून राहील..
तूच सूर, तूच शब्द, नजरेला अर्थ मिळेल,
होकाराच्या स्पर्शात, जीवन पुन्हा बहरेल..
काटेरी निवडुंगाचा, सदाबहार गुलमोहर होईल,
ओसाड क्षणांच्या वाळूत, नवा झरा वाहेल….
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
मनी दाटल्या भावनांना
ओसंडून वाहू दे
काळजातल्या वेदनांना
शब्दांतून वाट दे ॥
दे फेकून मनावरचे
मळभ ते नैराश्येचे
डोळे उघडून पहा एकदा
दिसेल किरण आशेचे ॥
धगधगत्या वणव्यातही
तावून सुलाखून निघशील तू
जीवन हे सुंदर आहे
पुन्हा एकदा बघशील तू ॥
दे फेकून अपेक्षांचे
ओझे ते मनावरचे
आहे तसे समोरच्याला
मनापासून स्विकारायचे ॥
संकटांच्या वादळातही
खंबीर उभा रहा
जीवनाला पुन्हा एकदा
होकार देऊन पहा ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
तारकांना पाहून निजलेले
चंद्र माझ्याशी भांडला
तुझ्या मोकळ्या बटात सखे
जसाच्या तसा त्यास मांडला
फक्त होकार देऊन पहा
अख्ख आकाश खेचतो खाली
ओढून घेवू सोबतीने
त्या चांदणचूर्याच्या पखाली
मखमली भासेल आंगण
चंद्र तारकांचा सडा
स्वप्नातही लावला तू
आपल्या प्रेमाचा लळा
हा बरा नाही आता
सखे तुझा लटका राग
आसुसलेलो भेटीसाठी
तनमनात पेटते आग
तुझ्या नकारातही दिसे
सखे मज का होकार
का लाजते अशी तू
ये धावून अन दे होकार
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



