Breaking
अमरावतीअहमदनगरई-पेपरकवितागोंदियाचंद्रपूरछत्रपती संभाजी नगरनागपूरनांदेडनाशिकपरभणीपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भ

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

0 4 8 2 9 0

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सहा🎗🎗🎗*

*☄विषय : शापित मन☄*
*🍂शनिवार : १२/ एप्रिल/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शापित मन*

शापित मन हे माझे
नसे ठाव काही….
नसे किनारा कोणता
कोणते गाव नाही …
का उगा काहूर सदा
मनी उठत राही..?
का मोकळा श्वास आता
फिरुनी गुंतू पाही…?
ते बंध रेशमाचे जणू
आताशा पाश ते होई…
नकोच कोणत्या आशा
नसे ध्यास काही…
क्षण होई कातर अन्
हळव्या क्षणांची आस राही..
का मन परी अजुनी
तुझेच गीत गाई.?
ते मोहरले क्षण कसे
फिरुनी येवो पाही..
शापित मन हे माझे
अगतिक होऊन जाई…

*सौ.सारिका रामदास मोरे .*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*

मी ‘पृथा’ बालपणीची
दत्तक मी कुंतीभोजाची
राजवधुमी हस्तीनापुरची
मी पांडू पत्नी ‘कुंती ‘

अजूनही शापित मन तगमगते
शोधते अजूनही कवचकुंडलधारी

दूर्वासाने वरदान दिला
दिली अशी दैवी शक्ती
मंत्रानेच पुत्रप्राप्ती….

अजाणतेपणे केले मंत्र आव्हान
तेजपूंज सात घोड्यावर स्वार
सूर्यदेव करी आमंत्रण स्वीकार….

झाली सूर्य देवाची कृपादृष्टी
मंत्राचीही आली प्रचिती
कुमारीस पुत्र प्राप्ती
झाले मी ,माता कुमारी

शिशु तेजपुंज सूर्यासम
कवचकुंडले लेऊन जन्म
काळजाचा तुकडा माझा
न करणे होई ‘स्व ‘पासून दुजा

राजकुमारी मी, कोमलमन
गुड सत्य ,अनामिक भीती…
कलंकिता मी सोडली नीती
मी माता झाले कुमाता..

हिम्मत नसलेली मी माता
अंगी नुसतीच कायरता
गालावरती अश्रू ओघळती
सोबत वाहती स्तनधारा….

माथा चुंबुन बाळाचा..
काळजावर दगड ठेवीला
लाकडी पेटीकेत शिशु वाहिला
अक्षरशा… गंगेत….

*सौ सुरेखा कोरे,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*

कळले नाही कधी मला
काय होते माझ्यात कमी
कळेना माझ्या योग्यतेची
का कुणीच घेईनात हमी.//

इथे हजार चांगली कामे
अविरतपणे करत आलो
एखाद्या मामुली चूकीने
मात्र टिकेचा धनी झालो… //

कधी मध्यान्ह रात्री होती
धाव घेतली कुणासाठी
पर त्यांनीच तोंड फिरवले
येथे दिवसा माझ्यासाठी.. //

कधी एका हाताने दिलेले
दुसर्‍यालाही कळले नाही
मात्र ज्यांच्यासाठी झटलो
ते माझ्याकडे वळले नाही.. //

प्राणपणाने सांभाळलीत
नैतिक मूल्ये, तत्व, सत्व
एकही कामी नाही आले
कुठे हरवले यांचे महत्व.. //

कळून चुकले बाजारात
सहजपणे विकतात गारा
मात्र अग्निदिव्य सोन्याला
आणि दुर्लक्षित होतो हिरा.. //

कळेना असे किती काळ
का “सत्य” भरडले जाते
कधी भेटेल उद्धार कर्ता
“शापीत मन” दग्ध होते.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*शापित मन*

शापित मन घेऊनी उशाशी त्या रात्री मी निजलो
डोळ्यातील अश्रूूना दु:ख सांगत राहिलो||

गोड बोलूनी डाव साधला
मीच कसा फसलो
कावा त्यांचा न ओळखता कसा फशी मी पडलो ||

काळोखाच्या भवती भिंती, तरी
मी नाही खचलो
पहाटेच्या क्षितिजावर खोदीत
लेणी बसलो ||

अंतरीचा मम डोह कोरडा, पाणी सारे आटले
काळजातील मायेचा झरा
शोधित मी राहिलो ||

मज जवळचे गुलाब गंधित
कुणी हिरावून नेले
दुष्काळी परी बहर फुलांचा खुशाल शोधित गेलो ||

अंगांगावर अन्यायाच्या असंख्य दुखऱ्या खुणा
परी न्यायाच्या घरचा अजूनी
पत्ता पुसत निघालो||

न्याय कधी तो मिळो बापडा
निष्पापाला मला
निर्दोष सुटले बेमुर्वत त्यांना जाब विचारू लागलो||

अपराध्यांना शिक्षा देण्या कोण
कमी पडले
बेबंदशाही इथे नांदते, दु:खे
विषण्ण हसलो||

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*

ती आणि मी
एकाच घरच्या सूना
पण तिला घरात
मुलीचा मान…
तर मला,
मोलकरीणचे स्थान..
उडाण भरायला
तिला खुले सारे आकाश…
माझ्या भोवती सैदव
पारतंत्र्याचे गच्च पाश..
नटणे, उठणे बसणे
सारेच कसे तिच्या मर्जीत..
माझ्या ईच्छा आकांशा
लग्नमंडपीच झाल्या वर्जीत..
कुणाचे काहीही न करता
तिला कौतुकाची थाली..
सर्वांचे सर्व करूनही
माझी ओंजळ जन्मभर खाली..
भेदभाव हा घरातील
नित्य मी सहते..
दोषाचे सुमन मी
कुणालाच ना वाहते..
पण,
शापित मन माझे
आतल्या आत झुरते..

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*

शापित मन अहिल्या
झाली पाषाण मूर्ती
बदलेना कांही केल्या
ऋषीची मोठी किर्ती ॥१॥

कैक वर्षे लोटली
आशा तिची संपली
पदरी निराशा आली
शापित ती ठरली ॥२॥

अखेर एके दिनी पवित्र
रामरायाच्या स्पर्शानी
बोलवाला झाला सर्वत्र
प्रकटली ती शिळेतूनी ॥३॥

रामाच्या पुण्याईनी
मिळाली तिज संजीवनी
प्रभू कृपेने मिळून जीवन
जीवीत झाली वरदानानी ॥४॥

अहिल्यादेवीस लाभली
अशी ही दिव्य कृपादृष्टी
उध्दारकर्त्या श्रीरामाने केली
पावन,अहिल्या कष्टी ॥५॥

अहिल्येच्या शापित मनाची
उघडली सारी गुपित कवाड
रामरायाच्या आशिर्वादाची
नशिबाने केली निवड ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे