सर्वश्री माध्यमिक विद्यालयात महिला शिक्षिकेचे मानसिक शोषण
शिक्षण संस्थाचालकाकडून महिला शिक्षिका आर्थिक शोषणास बळी
सर्वश्री माध्यमिक विद्यालयात महिला शिक्षिकेचे मानसिक शोषण
शिक्षण संस्थाचालकाकडून महिला शिक्षिका आर्थिक शोषणास बळी
नागपूर शहरातील दिघोरी येथील प्रकरण
पीडित शिक्षिकेला १० वर्षापासून मानसिक व आर्थिक त्रास न्यायासाठी परिषदेत धाव !
नागपूर : पुरोगामी महाराष्ट्रात जेथे महिलांना समान संधी असल्याचे जगजाहिर आहे, जेथे महिलांकरीता लाडकी बहिण योजना सारख्या अनेक योजना शासनाकडून मोठा गाजावाजा करुन चालविल्या जाते, अशा महाराष्ट्रात एका निराधार महिला शिक्षिकेस हेतूपुरस्परपणे मागील तब्बल दहा वर्षापासून मानसिक व आर्थिक त्रास दिघोरी येथील सर्वश्री माध्यमिक विद्यालयचा संस्थासचिव व मुख्याध्यापक असलेल्या राजेश मासूरकर याचे कडून दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.
शहरातील दिघोरी येथील सर्वश्री माध्यमिक विद्यालय येथे अन्यायग्रस्त वरिष्ठ शिक्षिका किरण भुजाडे ह्या मागील सन २००९ पासून कार्यरत एन टी प्रवर्गामधून कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे भुजाडे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाची मान्यता आहे व या पूर्वी एक महिण्याचे वेतन सुद्धा शासनाकडून त्यांना मिळाले आहे. असे असताना संस्थासचिव व मुख्यध्यापक असलेल्या मासूरकर यांनी अवैधपणे डोनेशन च्या नावाखाली भुजाडे यांचे कडे पैशाची मागणी केली. परंतु शिक्षिका भुजाडे यांनी पैशाची पुर्तता न केल्याने राजेश मासूरकर याने तत्कालीन शिक्षणाधिकारी पटवे व काटोलकर या अधिकाऱ्यांसोबत संगणमत करुन कुठलेही आधार नसलेले कारण देत भुजाडे यांची सन २०२२ मध्ये सेवा समाप्त केली. सोबतच एन टी प्रवर्गामधून शिक्षिका भुजाडे यांचे जागेवर गौरी गोस्वामी नामक महिलेस बनावट बिएड पदवीच्या आधारे आर्थिक देवाण घेवाण करून नियुक्त केले.
त्यानंतर अन्यायग्रस्त शिक्षिका किरण भुजाडे यांनी त्यांच्या अन्यायकारक सेवासमाप्ती विरुद्ध शाळा न्यायाधिकरण मध्ये न्याय मागितले असता शाळा न्यायाधिकरणाने शिक्षिका किरण भुजाडे यांचे बाजूने निकाल दिला. शाळा न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर भुजाडे या नियमित शाळेत जात असताना व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे भुजाडे यांना रुजु करुन घेण्यात यावे असे आदेश असताना राजेश मासूरकर यांचे कडून शिक्षिका भुजाडे यांना शाळेत येण्यापासून रोखणे, हजेरीपटावर स्वाक्षरी करू न देणे असे प्रकार करुन मानसिक व आर्थिक त्रास दिल्या जात आहेत.
या त्रासाला कंटाळून न्याय मिळविण्याकरीता शिक्षिका किरण भुजाडे यांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक आमदार यांचे कडे अनेक तक्रारी केल्या, परंतु त्यांच्या तक्रारीवर कुठलाही निर्णय संबंधितानी न घेतल्याने निराधार महिला शिक्षिका किरण भुजाडे यांनी न्यायाची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.