कृष्णा हरी राऊळ यांचे दुःखद निधन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आणि दिलखुश क्रीडा मंडळ, आवास [ पाठक आळी ] चे अध्यक्ष सुधीर कृष्णा राऊळ ह्यांचे वडील, आवास गावातील एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व कृष्णा हरी राऊळ (अण्णा) ह्याचे बुधवार दि. २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी आवास [ पाठक आळी ] येथे त्यांच्या रहात्या घरी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धाप काळाने दुःखद निधन झाले आहे. गुरूवार दि. २९ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता आवास येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. ६ जून २०२५ रोजी आवास येथे सकाळी ८.०० वाजता होणार आहे.
कृष्णा हरी राऊळ सारस्वत सहकारी बँक लिमिटेड मध्ये ३६ वर्षे प्रामाणिकपणे सेवा करुन निवृत्त झाले होते. ते अतिशय मायाळू, प्रेमळ, सुस्वभावी व कष्टाळू होते. त्यांच्या निधनाने आवास गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
