ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरनागपूरविदर्भसाहित्यगंध
गावाकडचं नातं
ज्योती नवघडे/हजारे ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर

0
5
1
7
8
7
गावाकडचं नातं
आजही मज आठवते
शिवार माझ्या रं गावाचं
हलणाऱ्या वाऱ्या संग
डौलान पात डुलत पिकाचं…..१
नागमोडी वळणांनी येते
नदीची रे वाट
न्यार रूप तिचं
वाहत पाणी खळाळतं…..२
डोंगरांची रांग जणू
गावाच्या डोळ्याचं अंजन
जशी शिल्लारी धाटणीचे
निळ्या नभाचे वळण……३
जसे गाव तशी ती माणसं
मायेची किनार त्यांच्या वागण्यात
जीवाला जीव लावणारं
माझ्या गावाकडचं नातं……४
वळवाच्या पावसाचा जसा
मनी मृदगंध सुखावतो
नात्याचा सुगंध तसा
घराघरात पसरतो…..५
ज्योती नवघडे/हजारे
ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर
========
0
5
1
7
8
7



