
0
5
7
4
4
8
आईपण
आईपण देगा देवा
साऱ्या पुण्याईचा ठेवा
कुळाचा उद्धार व्हावा
वंशाचा लागेल दिवा.
बाईपणाचा सरेल हेवा
आईपणाला हिरवा दिवा
बाईचा जन्म सार्थ व्हावा
मातृत्वाला न्याय मिळावा.
आईपण सगळ्यात भारी
आईची ममता सर्वात न्यारी
देवाच्या पुढे आईची वारी
आईच आहे जगात निरंकारी
आईच आहे पोटाची भाकरी
आईच करते सर्वांची चाकरी
संसारासाठी करते नोकरी
आईविना त्रिलोक भिकारी.
आईच घेते काळजाचा ठाव
आईच्या उरात लेकरांचा घाव
आईच आहे सुखतला रानमेवा
आईच आहे वनव्यातला गारवा.
अनु/ बेबीताई बोईनवाड
ता. जिल्हा नांदेड
=========
0
5
7
4
4
8



