
0
6
4
4
8
9
दगडी पाटी
लाकडाची चौकट
जरी काळी भुरकी
वर पेन्सिलचा तुकडा
दगडी पाटी माझी लाडकी.
पाटीवर सरस्वती
हळदी कुंकू वाहून फूल
पाडव्याच्या मुहूर्तावर
शाळेत पडे पहिले पाऊल.
अक्षरे अंक लिहायचे
लिहून पुसायचे
नको खोड रबर
थुंकीने पुसायचे.
वारा फुंकर घालायचा
चिमणी पाणी प्यायची
ओली पाटी मग
लगेच कोरडी व्हायची.
बाबांची दगडी पाटी
मला जादूचा वाटला पेटा
दप्तराचे ओझे नाही
जणू संगणक छोटा .
विमल धर्माधिकारी
ता.वाई, जि.सातारा
===========
0
6
4
4
8
9



