ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरनांदेडमराठवाडासाहित्यगंध
उत्सव स्वातंत्र्याचा
बळवंत शेषेराव डावकरे ता. मुखेड, जिल्हा नांदेड

0
5
9
4
1
4
उत्सव स्वातंत्र्याचा
गर्व आहे मजला गड्यांनो
भारतीय मी असल्याचा
घरोघरी डौलतो तिरंगा
उत्सव चालला स्वातंत्र्याचा
मिळवले असे हे स्वातंत्र्य
शूरवीरांच्या बलीदानाने
हसत चढले फासावरती
फुगवत छाती अभिमानाने
हुतात्मा ते वीर झाले
स्वातंत्र्य आम्ही लाटतो
क्रांतीकारकांच्या आठवणीने
राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवतो
सिंहावलोकन करु आपण
काय कमावले काय गमावले
डोकावून पहा अंतर्मनात
स्वातंत्र्याने खूप मिळवले
स्मृतींना उजाळा देऊन
घेऊ मागोवा त्यांच्या कार्याचा
आनंदाचा दिन हा आपला
उगवला सुदिन स्वातंत्र्याचा
बळवंत शेषेराव डावकरे
ता. मुखेड, जिल्हा नांदेड
=============
0
5
9
4
1
4



