Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

चला जाणून घेऊया..!! आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास! भाग२

डॉ. अविनाश प. परांजपे रचना आनंदवन सोसायटी वानाडोंगरी, नागपूर

0 6 3 3 0 8

चला जाणून घेऊया..!! आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास! भाग२

श्री शिवशंकरांनी त्या कुरूप बालकास मातेस बोलविण्यास सांगितले प्रत्यक्ष पार्वती माता आल्यानंतर तिने त्या बालकाची व त्याच्या धर्मपित्याची ओळख करून दिली त्याप्रसंगी जग्नमाता पार्वतीने केलेले बाल वक्रतुंडाचे कौतुक भगवान शिवांनी स्वतः अनुभवलेला त्याचा करारीपणा शौर्य बुद्धिमत्ता धडाडी यामुळे श्री भगवान शिव शंभू अतिप्रसन्न चित्त झाले. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या बालकास 14 विद्या आणि 64 कला यामध्ये पारंगत करण्याचे ठरविले लगेच त्या काळातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व आघाडीचे गुरु श्री वेदव्यास यांना आमंत्रित केले. गुरुदेव वेदव्यास यांनी या शिष्यत्तमाचा सहर्ष स्वीकार केला. वक्रतुंडास सर्व विद्या आणि कलांमध्ये पारंगत केले. या शिक्षणास श्री वक्रतुंड यास एक तप म्हणजे बारा वर्षे एवढा कालखंड लागला. यात श्री व्यासमुनी यांनी पार्वती नंदनास चतुर्वेद पुराणे उपनिषदे,दर्शने, संहिता, आयुर्वेद, शस्त्रविद्या,अस्त्र विद्या, राज्यशास्त्र,अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, ज्योतिष शास्त्र, मंत्रशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, पाकशास्त्र, धनुर्वेद आणि असंख्य विद्यासंपन्न केले. यानंतर तरुण वयाच्या श्री वक्रतुंडाने गुरु श्री वेदव्यास यांना गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ म्हणून विचारणा केली. योग्य वेळी मागेन! असे श्री व्यास ऋषींनी सांगितले;आणि त्याची पुनश्च कैलाश आश्रमी पाठवणी केली.

आश्रमात परतल्यावर श्री भगवान शिव शंकरांनी श्री वक्रतुंडास आता पुढची तुझी मनीषा काय अशी विचारणा केलीअसता, श्री पार्वती नंदनाने प्रभू शिव शंकरांना सांगितले, की शिक्षण घेत घेत त्याने त्रिखंडात संचार करणाऱ्या श्री व्यास महर्षींबरोबर संपूर्ण जम्बुद्वीपावर विचरण केले असता;त्यास प्रजेचा आक्रोश आणि दुर्गती जवळून बघावयास मिळाली.त्यामुळे त्याची अशी इच्छा आहे की त्या अत्याचारी विघ्नासुराचा नायनाट करून दुःखीजनांचे दुःख निवारण करावे. त्याची आकांक्षा सहर्ष स्वीकार करून श्री भगवान शिवशंकरांनी पार्वती माता आणि श्री वक्रतुंड यांचे बरोबर विचार विनिमय केला.श्री शिव शंकरांनी वक्रतुंड यास सांगितले की, तुझ्या तोडीचा कोणीही अन्य विद्वान योद्धा कलाविद राज्यशास्त्र अर्थशास्त्र जाणकार अन्य कोणीही या पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे तूच या अत्याचार यांच्या विरोधात तरुणांचे संघटन उभारून त्याचे द्वारा राक्षसी शक्तींचे निर्मूलन करावेस व विघ्नासुराचा सर्वनाश करावा. त्यासाठी तुला तरुणांच्या संघटनेचे नेतृत्व करावे लागेल.परंतु सामान्य मानवाच्या मानसशास्त्रानुसार मानवास मिळणाऱ्या नेता हा दिसण्यासही देखणा असेल तरच संघटनेला बळ आणि यश मिळते.

परंतु दुर्दैवाने तुझे निसर्गाद्वारे मिळालेले रूप हे वाकड्या तोंडाचे वाजवीपेक्षा जास्त लांब नाकाचे असल्यामुळे तुझी जनतेसमोर येणारी प्रतिमा ही जनमानसाचा ठाव घेणारी असायला हवी, म्हणून मी तुला हस्तीमुख म्हणजेच हत्तीचे मुख असलेला मुखवटा प्रदान करीत आहे. हस्तिमुख प्रतिमेचा मुखवटा घालूनच तू इतर जनांच्या समोर जावे. कारण हत्ती हा जसा सर्व प्राण्यांमध्ये सर्व शक्तीमान आहे. तसेच तो सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात बुद्धिमान देखील आहे. यापुढे असे समजावे की मी तुला नवा चेहराच दिला आहे. त्यामुळे मी तुझे नामाभिदान आज पासून गजवदन म्हणून करीत आहे. श्री गजानन वक्रतुंडाने पितृ आज्ञा शिरसावंद्य मानून तदनुसार आचरण सुरू केले. त्यामुळे सर्वत्र अशी बातमी पसरली की श्री शंभू महादेवाने वक्रतुंडाचे डोके बदलले आणि भोळ्या भाबड्या अज्ञानी लोकांनी त्याची परिणीती श्री महादेवाने वक्रतुंडाचे मुंडके उडवून मग माता-पार्वतीच्या रुदनामुळे व आक्रोशामुळे त्या ठिकाणी हत्तीचे मुख चिकटविले. अशी वदंता पसरली

आपण असल्या अनैसर्गिक व अवैज्ञानिक वदंता नाकारल्या पाहिजेत.  त्यानंतर श्री गजवदन वक्रतुंडाने युवकांची फौज उभारली आणि त्यांची ओळख म्हणजेच आयडेंटिटी किंवा पहेचान म्हणून त्यास हस्तीमुखाचा मुखवटा प्रदान केला आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यास गजानन उर्फ गज आनन म्हणून संबोधने सुरू केले. श्री गजवदनाने आपल्या संघटनेची मांडणी येणे प्रमाणे केली. 21 गजानन कार्यकर्त्यांचा प्रमुख हा गजमुख, म्हणजे मुख्य. या 21 गजमुखकांचा प्रमुख म्हणजे गणनायक. या 21 गणनायकांचा प्रमुख म्हणजे एक विनायक. तसेच 21 विनायकांचा प्रमुख म्हणजे एक गणाधीश. अशा 21 गणाधीशांचा प्रमुख म्हणजे एक गणपती. अशा 21 गणपतींचा प्रमुख म्हणजे एक गणाध्यक्ष! श्री गजवदनाने जंबुद्वीपाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग पाडले. आणि या प्रत्येक विभागासाठी एक एक गणाध्यक्ष नेमला. या दोन्ही गणाध्यक्षांवर अंतिम सत्ता म्हणून स्वतःला श्री गणेश ही उपाधी घेतली. गणेश म्हणजे गणांचा ईश ! सर्वतोपरी.

डॉ. अविनाश प. परांजपे
रचना आनंदवन सोसायटी
वानाडोंगरी, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 0 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे