Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

नटरंगी नार

वृंदा (चित्रा) करमरकर ता. जि.सांगली

0 4 8 2 9 0

नटरंगी नार

ही नार अशी सुकुमार
हिची नजर तेजतर्रार
लयदार केशसंभार
सोसेना यौवनाचा भार

केसात माळली सुरंगी
कशी ही नार नटरंगी
तंग कंचुकी शोभे अंगी
कस्तुरीचा गंध अंगांगी

काया सतेज ही गोरटी
शोभे कशी सिंह कटी
नाजूकशी ही हनुवटी
नार सुंदर ही गोमटी

जशी सोनसळी मासोळी
सोन्याची अस्सल पुतळी
नभी उल्का लखलखली
तेजात न्हाऊनीया गेली

थिरकती तिची पावले
रसिक हे नादावले
लावण्य रंग उधळिले
नटराज तिथे अवतरले

वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जि.सांगली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे